local train knife attack
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - लोकलमधील चाकूहल्ले आणि प्रवाशांमधील क्षुल्लक वादांतून घडणाऱ्या हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेतील १५० स्थानकांचे सुरक्षा ऑडिट करून ३८ संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, सुरक्षेसाठी १४ प्रकारच्या आधुनिक उपकरणांची शिफारस करण्यात आली आहे.