Smart Electric Meter Issue in Thane
sakal
ठाणे - श्रीनगर येथील वारलीपाडा परिसरात महावितरण कर्मचाऱ्यांकडून सक्तीने 'स्मार्ट मीटर' बसवले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. "मीटर बसवले नाही तर वीज कापू किंवा मोठा दंड आकारू," अशी भीती दाखवून आणि रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे मीटर बसवण्यात आले आहेत. या मनमानी कारभारामुळे अवघ्या महिनाभरात नागरिकांची वीज बिले दुप्पट ते तिप्पट आली असून, संतप्त झालेल्या वारलीपाड्यातील रहिवाशांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.