

Sachin Sawant criticized on BJP toll army
ESakal
मुंबई : भाजपाच्या टोल आर्मीने मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांचा केलेला अपमान हा भाजपाचा जातीयवादी चेहरा दाखवणारा घाणेरडा प्रकार आहे. मागासवर्गीय समाजातील एक महिला मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करते ही मनुवाद्यांची खरी पोटदुखी आहे. हे केवळ संविधानाने शक्य झाले असून भाजपाची मनुस्मृती असती तर ते शक्य झाले नसते असा घणाघाती प्रहार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.