Sachin Tendulkar:हे ‘अर्धशतक’ सर्वांत संथ;सचिनची मिश्कील टोलेबाजी

सचिनच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याचा गौरव करणारा एक कार्यक्रम मुंबईत आज झाला. त्या वेळी सचिनने साहित्य सहवास ते पदार्पणाचा पाकिस्तान दौरा,
Sachin Tendulkar
Sachin Tendulkarsakal

मुंबई - मास्टरब्लास्टर अशी उपाधी असलेला व एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला द्विशतकवीर, तसेच एक ना अनेक वेगवान शतके आणि अर्धशतके करणारा सचिन तेंडुलकर सोमवारी (ता. २४) वयाची ५० वर्षे पूर्ण करीत आहे. हे अर्धशतक आपले सर्वांत संथ असल्याची मिश्कील कोटी त्याने मुंबईत झालेल्या एका समारंभात केली.

सचिनच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याचा गौरव करणारा एक कार्यक्रम मुंबईत आज झाला. त्या वेळी सचिनने साहित्य सहवास ते पदार्पणाचा पाकिस्तान दौरा, रणजी क्रिकेटमधील पदार्पणाचे शतक, वर्तमानपत्रातील पहिली मुलाखत आदी सर्व वाटचालींना उजाळा दिला आणि त्याच वेळी बोलताना आयुष्यातील हे अर्धशतक सर्वांत संथ असल्याचे हसत-हसत सांगितले.

छायाचित्र नसल्याने नाराजी

आठवणींच्या या हिंदोळ्यात रमताना सचिनने पहिल्या शतकानंतर आपले छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले नसल्याबद्दल त्याला कशी विचारणा होत होती, याचाही किस्सा सांगितला. ‘शालेय क्रिकेटमध्ये १९८५ मध्ये पहिले शतक केल्यावर सचिनच्या या खेळाचे वृत्तांकन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले होते

Sachin Tendulkar
Mumbai : न केलेल्या कामाचे श्रेय घेते केडीएमसी ! प्रशासनावर उपरोधिक टिका

परंतु त्यात त्याचे छायाचित्र नव्हते. त्यामुळे मित्रांपासून ते वडिलांच्याही मित्रांपर्यंत छायाचित्र का नाही, याची विचारणा झाली होती. साहजिक मी नाराज झालो होतो. त्यानंतर मात्र प्रत्येक मोठ्या खेळीच्या वेळी आपले छायाचित्र प्रसिद्ध होत होते.’

पहिली मुलाखत शिवाजी पार्कमध्ये

पत्रकारांशी असलेल्या नात्याबद्दल विचारले असता सचिनने पहिल्या मुलाखतीची आठवण सांगितली. शालेय वय असल्यामुळे मुलाखत म्हणजे काय हेच माहीत नव्हते. बरं, काय बोलायचे हा मोठा प्रश्न; तरीही वर्तमानपत्रासाठी पहिली मुलाखत शिवाजी पार्कच्या बाहेर असलेल्या एका हॉटेलमध्ये दिली. त्या वेळी भाऊ अजित सोबत असल्याने दडपण आले नाही.

वाढदिवसाचे गुपित

५० वा वाढदिवस कसा साजरा करणार? या प्रश्नाचे उत्तर सचिनकडेही नव्हते. कुटुंबाकडून काही तरी मोठी तयारी सुरू आहे; पण मला त्याचा थांगपत्ता लागू दिला जात नाही. मी विचारणा केली, तर कोणीच काही सांगत नाही... अरे काही तरी मला कल्पना द्या, मलाही त्यात सहभागी करून घ्या. माझ्या या प्रश्नाला कोणीच उत्तर देत नाही. आता सोमवारपर्यंत वाट पाहायची, असे सचिन हसत हसत म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com