
सचिन वाझेचे सहकारी पोलिस अधिकारी रियाझ काझी याला रविवारी NIAने अटक केली. आज रियाझ काझीला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.
Sachin Waze Case: पोलिस अधिकारी रियाझ काझी निलंबित
मुंबई: सचिन वाझेचे सहकारी पोलिस अधिकारी रियाझ काझी याला रविवारी NIAने अटक केली. दरम्यान आज रियाझ काझीला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. ॲंटिलीया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात काझीचा सहभाग आढळून आला होता. या प्रकरणात काझीला NIA नं अटक केल्यानंतर काझी वर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. काझी सध्या सशस्त्र पोलिस दलात कार्यरत होता. या गुन्ह्यादरम्यान वाझेसोबत तो तपास अधिकारी म्हणून काम करत होता. काझीवर या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सर्वप्रथम सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर NIAने पोलीस अधिकारी रियाझ काझीला अनेकदा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तशातच स्फोटकांच्या कटात सामील असणे आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणे या आरोपांखाली सचिन वाझेचा सहकारी रियाज काझीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा- मुंबईत सलग तीन दिवस कोरोना सक्रिय रुग्ण ९० हजारांपार
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटामध्ये रियाझ काझीही सामील होता अशी शंका NIA ला सुरूवातीपासूनच होती. म्हणूनच सचिन वाझेला ताब्यात घेतल्यानंतर काही दिवसांतच रियाझ काझीला चौकशीसाठी बोलवलं गेलं. त्याची वारंवार चौकशी करण्यात येत होती. CIU चे प्रमुखपद वाझेकडे होते आणि रियाझ हा देखील CIUचा अधिकारी असल्याने त्याच्यावर NIAला संशय असल्याचं समजलं होतं. अखेर रविवारी NIAने रियाझ काझीला कटात सहभागी असणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि मदत केल्याप्रकरणी अटक केली.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कोण आहे रियाझुद्दीन काझी
API रियाझुद्दीन काझी 102 बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. 2010 मध्ये त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची पोलीस भरती झाली. त्यांचे पहिले पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये PSIच्या पोस्टवर झालं होतं. तेथे त्यांनी प्रोबेशन पीरियडवर काम केले. वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये काही वर्षे काम केल्यावर त्यांची अँटी चेन-स्नॅचिंग स्कॉडमध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर रियाझुद्दीन यांची थेट CIU मध्ये बदली झाली. अँटिलिया स्फोटक प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावताच त्यांची बदली LA मध्ये करण्यात आली.
Sachin Waze Case API suspended riyaz kazi from service
Web Title: Sachin Waze Case Api Suspended Riyaz Kazi Service
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..