esakal | "बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो..."
sakal

बोलून बातमी शोधा

"बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो..."

शिवसेनेच्या अनिल परबांची सचिन वाझेने केलेल्या आरोपावर भावनिक प्रतिक्रिया

"बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो..."

sakal_logo
By
विराज भागवत

सचिन वाझेने NIAला आज एक पत्र लिहिलं. त्यात त्याने राज्याचे मावळते गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय घोडावत यांच्यावर आरोप केले. त्यापैकी परब यांच्यावर SBUT च्या ट्रस्टींकडून चौकशी थांबवण्यासाठी ५० कोटी रुपये मागितल्याचा आणि मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी करण्याचा आरोप आरोप सचिन वाझेकडून करण्यात आला आहे. या मुद्द्यावर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. "मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की माझ्या करण्यात आलेले दोन्ही आरोप खोटे आहेत", अशा शब्दात त्यांनी भावनिक पातळीवर आरोप फेटाळून लावले.

सचिन वाझे प्रकरणात नवा ट्विस्ट; एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची चौकशी

"सचिन वाझेने माझ्यावर लावलेले दोन्ही आरोप धादांत खोटे आहेत. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्या खंडणीचे संस्कार नाहीत. मी बाळासाहेबांची आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेउन सांगतो की हे सारं खोटं आहे. मला नाहक बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. गेले काही दिवस भाजपचे नेते तिसऱ्या मंत्र्याचा बळी घेऊ असं सांगत होते. बहुतेक सचिन वाझे असं पत्र देणार हे त्यांना माहिती होतं असं वाटतंय", असं म्हणत त्यांनी तपास प्रक्रियेवर शंका उपस्थित केली.

मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा

"राज्याच्या किंवा मुंबई पालिकेतील कंत्राटदारांशी माझी ओळख नाही. मी असं काहीही केलेलं नाही. त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. जानेवारी आणि जूनमध्ये सचिन वाझे मला भेटला असं तो म्हणतो तर मग एवढा तो दिवस गप्प का? परमबीर सिंह यांच्या १०० कोटींच्या पत्रातही माझ्यावर कोणतेही आरोप का नाहीत? केवळ मुखयमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची बदनामी करायची असा भाजपचा डाव आहे. मी या आरोपांसाठी नार्कोटेस्टला सामोरं जायलाही तयार आहे. माझ्या आणि पर्यायाने सरकारच्या बदनामीचा हा डाव असून ज्या जनतेने मला निवडून दिलंय त्यांना सत्य कळावं म्हणून ही पत्रकार परिषद घेतली", असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टेन्शन घेऊ नका, मुंबईतील कोरोना स्थितीबद्दल मोठी दिलासादायक माहिती

सचिन वाझेच्या पत्रात नक्की काय?

'जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी शासकीय बंगल्यावर मला बोलावलं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या चार दिवस आधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितली आणि नंतर चौकशी रोखण्यासाठी SBUTच्या विश्वस्तांकडून ५० कोटी रुपये मागितले. हे काम करण्यास मी असमर्थता दर्शवली होती. जानेवारी २०२१ मध्येही परब यांनी मला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलवलं. बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास मला सांगण्यात आलं. अशा ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी मला सांगितलं होतं. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधात CUIने केलेल्या तपासातून काहीच निष्पन्न झालं नाही', असे आरोप वाझेने अनिल परब यांच्यावर केले आहेत.

loading image