esakal | सचिन वाजेने कळवा स्थानकातून रुमाल खरेदी केले कारण...

बोलून बातमी शोधा

Sachin waze
सचिन वाजेने कळवा स्थानकातून रुमाल खरेदी केले कारण...
sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या सचिन वाजे प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार सापडली. त्यानंतर पाच मार्चला मुंब्र्याच्या खाडीत मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. मनसुखचा मृतदेह सापडला, त्यावेळी त्यांच्या तोंडात पाच ते सहा रुमाम कोंबलेले होते. मनुसखच्या तोंडात हे रुमाल दुसरं-तिसर कोणी नाही, तर सचिन वाजेनेचं कोंबल्याच सांगितलं जात आहे.

मनुसखची हत्या झाली, त्यादिवशी सचिन वाजे CCTV ची नजर चुकवून लोकल प्रवास करुन ठाण्याला आला. त्याने कळवा स्थानकात रुमाल खरेदी केल्याची दाट शक्यता आहे. NIA च्या तपासात कळवा स्थानक परिसरातले CCTV तपासले असता, वाजेंप्रमाणे एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचे CCTV मध्ये कैद झालं आहे. CCTV अस्पष्ट असला तरी, कपड्याचा रंग आणि देहबोली ही वाजेंसारखीच आहे. त्यामुळे सचिन वाजेने मनसुखच्या हत्येआधी कळव्यात रुमाल खरेदी केल्याचा संशय आहे.

हेही वाचा: सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

या प्रकरणात आता अटकेत असलेला पाचवा आरोपी सुनिल माने याच्या घरी NIA नं काल छापेमारी केली. या वेळी NIA नं त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्वाचे कागदपत्र आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे माने हे देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं होतं.