esakal | सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

बोलून बातमी शोधा

शैलजा नाकवे

माझी आई मृत्यूला स्पर्श करुन परतली, मुंबईतील घटना

सकारात्मक बातमी, डॉक्टरांनी फक्त २४ तास दिले होते, पण...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सध्या कोरोनाकाळात सातत्याने निराशाजनक बातम्या कानावर येत आहेत. या परिस्थितीत मुंबईतून एका मोठी दिलासादायक आणि आत्मविश्वास उंचावणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत एका ७५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी कुटुंबीयांना तुमच्याकडे फक्त २४ तासांचा वेळ आहे, अशी स्पष्ट कल्पना दिली होती. ज्येष्ठ नागरीक असलेल्या महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण महिलेने कोविडशी यशस्वी झुंज दिली व मागच्या आठवड्यात १३ दिवसानंतर रुग्णालयानंतर घरी परतली.

शैलजा नाकवे यांना घाटकोपरच्या सोनाग्रा मेडिकल अँड सर्जिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. शैलजा यांचे कोरोनामधुन बरे होणे, ही रुग्णालयासाठी देखील मोठी बाब आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेसनी केक कापून शैलजा यांचा डिस्चार्ज साजरा केला. "शैलजा यांचे बरे होणे हा व्हायरस विरुद्धचा विजय आहे. त्यांना डायबिटीसही होता. शैलजा यांना रुग्णालयात आणले. त्यावेळी फुफ्फुसापर्यंत संसर्ग झाला होता. त्यांना पूर्णपणे व्हेंटिलेटरची आवश्यकता होती" असे शैलजा यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर राजाराना सोनाग्रा यांनी सांगितले.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी एक मोठी चांगली बातमी

शैलजा यांना मागच्या तीन-चार दिवसांपासून ताप येत होता. शैलजा यांचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी आला होता, त्यावेळी शैलजा यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण घटून ६९ टक्के झाल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी लगेच ऑक्सिजन बेड उपलब्ध असलेल्या घाटकोपरच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले. माझी आई मृत्यूला स्पर्श करुन परतल्याचे मुलाने म्हटले आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: 'बोलघेवड्यांना एवढचं सांगू इच्छितो की...' देवेंद्र फडणवीस म्हणाले...

आठ एप्रिलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. श्वासोश्वास करताना त्यांना त्रास होत होता. डॉक्टरांनी रेमडेसिव्हीर आणि अन्य औषधांनी उपचार सुरु केले. रेमडेसिव्हीरची सहा इंजेक्शनची व्यवस्था करण्यासाठी जे अग्निदिव्य पार पाडावे लागले, ते कधीच विसरणार नाही असे प्रशांत नाकवे यांनी सांगितले. "माझ्या आईकडे फक्त २४ तास आहेत, असे सांगितल्यानंतर माझ्या डोक्याने काम करणे बंद केले होते. आई माझी लढवय्यी आहे, असं माझं मन मला सांगत होतं. आमच्यापैकी कोणीही अपेक्षा सोडली नव्हती" असे प्रशांतने सांगितले.

पाच दिवसांनंतर कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून राहणे कमी झाल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. घरी असताना शैलजा यांना दिवसाला दोन लिटर ऑक्सिजन लागतो. त्यांना कोरोनामधुन पूर्णपणे बरे होण्यासाठी सहा महिने लागतील असे डॉक्टर सोनाग्रा यांनी सांगितले. शैलजा यांचा सीटी स्कोर २५/२५ होता. आयसीयू उपचारांमध्ये हा चांगला स्कोर समजला जातो. त्यामुळे शैलजा यांना डिस्चार्ज मिळाला.