

Sadashiv Patil
ESakal
अंबरनाथ : गेल्या पंधरा दिवसांपासून तापलेले अंबरनाथचे राजकारण अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून भाजपला शिंदे गटाने जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्षपदी निवडून आले असून नगर परिषदेवर शिवसेना (शिंदे गटाने) पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यात शिवसेनेला यश आल्याने नगर परिषदेत युतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.