CCTV InstallationSakal
मुंबई
Ulhasnagar News : उल्हासनगरात 985 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम फास्ट-ट्रॅकवर, पांढऱ्या पोलवरील कॅमेरे लक्ष वेधू लागले
CCTV Installation : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या निर्देशानुसार उल्हासनगरात ९८५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम जलदगतीने सुरू असून, यामुळे शहरातील सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.
उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने 5 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या जीआर मध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशान्वये उल्हासनगरात वॉच ठेवण्यासाठी 985 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम फास्ट-ट्रॅकवर सुरू झाले आहेत.पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी ही माहिती दिली आहे.