

Tourist Rescue Operation At Prabalgad
ESakal
पनवेल : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंतीसाठी गेलेले दोन १७ वर्षीय पर्यटक प्रबळगड परिसरात रस्ता चुकल्याने डोंगरात भरकटले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच दोघांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर पनवेल तालुका पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ, निसर्गमित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त शोधमोहीम राबवून दोघांचीही सुखरूप सुटका केली.