esakal | संजय दत्त उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay dutta

रविवारी सकाळी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाला होता. त्याठिकाणी काही टेस्ट करण्यात आल्यानंतर सांयकाळी सव्वा पाचच्या सुमारास घरी सोडण्यात आलं होतं.

संजय दत्त उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल झाला. संजय दत्तचा कॅन्सर अॅडव्हान्स स्टेजमध्ये असल्यानं त्याच्यावर तातडीनं उपचारांची आवश्यकता आहे. शनिवारी 15 ऑगस्टला टेस्ट करण्यासाठी संजय दत्त रुग्णालयात गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी मुंबईतील लिलावीती रुग्णालयात दाखल झाला होता. त्याठिकाणी काही टेस्ट करण्यात आल्यानंतर सांयकाळी सव्वा पाचच्या सुमारास घरी सोडण्यात आलं होतं. 

संजय दत्त मंगळवारी सायंकाळी सात वाजता बांद्रा इथल्या घरातून रुग्णालयाकडे गेला. त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी मान्यता दत्त, दोन्ही बहिणी होत्या. माझ्यासाठी प्रार्थना करा असंही संजय दत्त म्हणाला. तो रुग्णालयात जात असताना घराबाहेरचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 

दरम्यान, पुढील उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. त्याआधी तो सडक 2 चे डबिंग  पूर्ण करणार असल्याचेही समजते.  “ सडक 2 ” पाठोपाठ संजयचा “ भूज “ हा चित्रपट ही प्रदर्शित होणार होता व त्याचेही चित्रीकरण सुरूच होते . “ केजीएफ 2 ” हाही एक मोठा चित्रपट आहे. रणबीर कपूरच्या “ शमशेरा ” मध्येही संजय काम करीत आहे . मध्यंतरी काही बड्या निर्मात्यांसमवेत संजय दत्तने वेब सिरीजसाठी काही प्रोजेक्ट्स साईन केल्याचे समजले होते . आशुतोष गोवारीकर यांच्या “ पानिपत ” नंतर संजय दत्त पुन्हा बॉलीवूडमध्ये सक्रीय झाला होता व त्याने विविध निर्माते-दिग्दर्शकांसमवेत बैठका घेतल्या होत्या, असे समजते.

loading image