ठाण्यात रंगला ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ सोहळा

Sakal-Excellence-Award
Sakal-Excellence-Award

ठाणे - जिद्द, कष्ट आणि अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे रविवारी (ता. २८) दिमाखदार समारंभात करण्यात आला. आपल्या माणसांचा सन्मान पाहण्यासाठी आलेले कुटुंबीय आणि चाहते, मान्यवर पाहुणे आणि सेलिब्रिटी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा रंगतदार झाला.      

ठाणे जिल्ह्यातील ३० कर्तृत्ववान व्यक्तींना ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन गौरवण्याचा हा हृद्य सोहळा ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथील भव्य सभागृहात रंगला. हॉटेल टिप टॉप प्लाझा या सोहळ्याचे ‘व्हेन्यू पार्टनर’ होते. अनेक सत्कारमूर्ती सहकुटुंब पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.

‘सकाळ’मध्ये पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कार्याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. ही माहिती सोहळ्याच्या स्थळी मोठ्या एलईडी पडद्यावर दाखवली जात होती. त्यावेळी अनेक सत्कारमूर्तींच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत पाणी तरळताना दिसत होते. 

या दिमाखदार आणि नेटक्‍या सोहळ्याची सुरुवात गणेशवंदनाने झाली. ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ माध्यम समूहा’चा ८७ वर्षांचा प्रवास त्यांनी उलगडला. या वेळी ‘सकाळ’चे वितरण महाव्यवस्थापक दिनेश शेट्टी, टिप टॉप प्लाझाचे रोहित शहा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री श्रेया बुगडे, प्राजक्ता माळी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

कार्याची ओळख करून देत गौरव होत असल्यामुळे पुरस्कारविजेते भारावले होते. हे मान्यवर व्यासपीठावर येताना आणि पुरस्कार स्वीकारताना टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. ‘सकाळ’ने दिलेल्या पुरस्कारामुळे आमच्या कार्याची माहिती व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचली. या सन्मानामुळे आणखी चांगले काम करण्यासाठी आम्हाला बळ मिळाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले.

‘सकाळ माध्यम समूहा’ने वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करून पुरस्कारांनी गौरवले, ही अभिमानासद बाब आहे. हे पुरस्कार मिळवणाऱ्यांची जबाबदारी वाढली असून, आणखी उत्कृष्ट काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. पुरस्कारांमुळे एक नवी ओळख मिळाली आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून त्यांचे कार्य केवळ ठाणे जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात आणि राज्याबाहेरही पोहोचले आहे. ‘सकाळ’ आपल्या ख्यातीप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाला मोलाचे योगदान देणाऱ्यांना नवी उभारी देत राहील, ही अपेक्षा.  
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

‘सकाळ’ हे वृत्तपत्र म्हणून समाजासाठी नेहमीच इतरांपेक्षा वेगळी आणि ठोस भूमिका मांडत आला आहे. समाजासाठी काहीतरी करू पाहणाऱ्यांना सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार देऊन गौरविण्याची ही कल्पनाच वेगळी आहे. त्यांचा हा गौरव करण्याची संधी ‘सकाळ’ने मला दिली, त्यासाठी मनःपूर्वक आभार. सकाळ समूहाच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.  
- श्रेया बुगडे, अभिनेत्री

गेली ८७ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम ‘सकाळ’ हे वृत्तपत्र करत आहे. आजही परखडपणा ‘सकाळ’ने जपला आहे.त्यांच्यातील निर्भीड पत्रकारिता कायम रहावी यासाठी शुभेच्छा. समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांचा आज गौरव करण्यात आला. त्यात खारीचा वाट उचलण्याची संधी ‘सकाळ’ समूहाने मला दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवून आम्हाला त्यामध्ये सहभागी करून घ्यावे. 
- प्राजक्ता माळी, अभिनेत्री

‘सकाळ’सारख्या नामांकित वृत्तपत्राकडून कामाची दखल घेतली जाणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे समाजासाठी सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते. आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी मौल्यवान असून मला यामधून कायम सकारात्मक ऊर्जा मिळेल. 
- सुमेध भवार, सीईओ, पाईप टेक इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रा. लि.

आमच्यासारख्या समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सेवकांचा सन्मान करण्यात आला. ‘सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड २०१९’ हा पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि ‘सकाळ’च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
- शैलेश वडनेरे, नगरसेवक, कुळगाव-बदलापूर नगरपालिका 

तळागाळातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी झटत राहिले. त्या संघर्षाची दखल घेत ‘सकाळ’सारख्या सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राकडून माझा सन्मान झाला, हे मी माझे भाग्य समजते. त्यामुळे समाजासाठी नव्याने काम करण्याची स्फूर्ती मिळाली. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.
- हेमलता पाटील, अध्यक्ष, एकनाथ पाटील (दादा) फाऊंडेशन

गेली कित्येक दशके प्रशांत कॉर्नरच्या माध्यमातून मिठाईच्या क्षेत्रात व्यवसाय आहे. त्याचबरोबर ग्राहकांना उत्तम दर्जाचे गोडधोड देण्याचे व्रत कायम ठेवण्यासाठीची कसरतही होती. आमच्या या संघर्षाला ‘सकाळ’ वृत्तपत्राने दिलेला हा सन्मान बहुमोलाचा आहे. समाजातला गोडवा वाढवण्यासाठी असे पुरस्कार आवश्‍यक असतात. 
- प्रशांत सकपाळ, मालक, प्रशांत कॉर्नर

समाजातील चुकीच्या गोष्टींवर टीकेचे कठोर प्रहार आणि सकारात्मक व चांगल्या गोष्टींवर प्रोत्साहनाची फुले उधळणे ही ‘सकाळ’ची जनमानसात ओळख आहे. अशा वृत्तसमूहाकडून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला याबद्दल आनंद आहे.
- डॉ. रोहित माधव साने, साने केअर (माधवबाग)

‘सकाळ समूहा’ने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्‍टरांची कामगिरी पाहून त्यांचा पुरस्कार देत सन्मान केला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देणाऱ्या ‘सकाळ’ने खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्राला न्याय दिला आहे, असे म्‍हणाले लागेल. ‘सकाळ’चे मनापासून धन्‍यवाद.
- डॉ. नितीन मोकाशी, भिवंडी

शहरी व ग्रामीण भागाच्या पायाभूत विकासासाठी नेहमीच पडखडपणे लिखाण करून विकासकामाला दिशा देण्याचे काम ‘सकाळ’कडून होत आले आहे. सध्‍या आणि भविष्‍यातही ‘सकाळ’कडून हेच काम होईल याबाबत मनात कोणतेही शंका नाही. पुरस्‍कार सोहळा हा दैदीप्यमान म्‍हणावा असा होता.
- दुर्राज कमानकार, भिवंडी 

परिवहन सेवा, रेल्वे, रस्ते, पाणी, स्वच्छता अशा नागरी समस्या सोडवण्यासाठी ‘सकाळ’ने नेहमी पुढाकार घेतला आहे. या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम अनेक समाजसेवक करतात. अशा व्यक्तींना ‘सकाळ’ने पुरस्कार देऊन गौरविले आहे, ही भूषणीय बाब आहे.
- ॲड. वैभव भोईर, भिवंडी 

प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते. मात्र ते शोधण्यासाठी गरज असते ती कष्टाची आणि चिकाटीची. असे गुण हेरून समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘सकाळ समुहा’ने ‘सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड २०१९’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 
- समीर शा. जगे, मुख्य ट्रस्टी, साक्षी चॅरिटेबल ट्रस्ट 

वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड’ने गौरवून सकाळ माध्यम समूहाने जे काम केले आहे, त्यामुळे आम्हा पुरस्कर्थींना भविष्यात जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. याबद्दल ‘सकाळ’च्या संपादकांचे आणि व्यवस्थापक समूहाचे आभार.
- रोहितभाई शहा, टिप टॉप प्लाझा पार्टनर

राज्‍यातील उद्योग क्षेत्रास ‘सकाळ’ वृत्तपत्राने नेहमी दिशादर्शक भूमिका ठेवून मोलाचे मार्गदर्शन केले आहे. दैनिकातील अनेक अथर्विषयक घडामोडी आणि त्‍याबाबचे विश्‍‍लेषण वाचत रहावे असे असते.  ‘सकाळ’च्‍या प्रगतीशील भूमिकेमुळे ग्रामीण व शहराच्या विकासाला हातभार 
लागला आहे.
- साईनाथ पवार, भिवंडी

जवळजवळ ४० वर्षे मी शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे. ‘सकाळ’ वृत्तसमूहाने याची योग्य ती दखल घेऊन आज मला सन्मानित केले, याचा मला अत्यंत आनंद झाला आहे. माझा यथोचित सन्मान केल्याबद्दल मी सकाळ वृत्तपत्र समूहाचे आभार मानतो.
- डॉ. शिवाजीराव जोंधळे, शिवाजीराव जोंधळे एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष

गेली ४० वर्षे मी ‘सकाळ’चा वाचक आहे. पुणे ‘सकाळ’ची आवृत्ती ही माझ्या शैक्षणिक वाटचालीतील खरे मार्गदर्शक आणि राजकीय वाटचालीतील गुरु राहिली आहे. सकाळ माध्यम समूहाने माझ्या कार्याची दखल घेत पुरस्कार 
प्रदान केल्याबद्दल मी त्‍यांचा अतशिय 
ऋणी आहे.
- संभाजी शिंदे, बदलापूर भाजप अध्यक्ष

आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे ‘सकाळ’ माध्यम समूहाने आम्हाला दिलेला पुरस्‍कार. या पुरस्कारामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. आमची जबाबदारी आणखी वाढली असल्याची भावनाही आहे. सकाळ समूहाने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
- डॉ. शिवाजी आढाव व डॉ. सुदर्शन पाटील, ऑप्टिलाईफ हॉस्पिटल

‘सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड २०१९’ ही आगळी-वेगळी संकल्पना आहे. समाजातील सर्व क्षेत्र समावेशक मंच ज्यात सामाजिक, सांस्कृतिक, उद्योजक, शैक्षणिक, व्यावसायिक आदी सर्व क्षेत्रातील रत्ने एकत्र आणून त्यांचा यथोचित सत्कार-सन्मान करून प्रेरणादायी आहे. 
- डॉ. राजेश मढवी, संस्थापक, अध्यक्ष, ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान

माझ्या कामाची सुरुवात सकाळबरोबरच झाली आहे. त्यामुळे ‘सकाळ’कडून गौरव होणे माझ्यासाठी खास आहे. पुरस्कारातून खूप काही शिकायला मिळते. इतर क्षेत्रातील मान्यवरांच्याही कामाची ओळख या पुरस्कार सोहळ्यामुळे झाली. ‘सकाळ’चे मनःपूर्वक आभार.
- अमोल धर्मे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी एन्टरप्रायझेस

अत्यंत दैदीप्यमान सोहळ्यात ‘सकाळ’चा एक्‍सलन्स ॲवॉर्ड प्रदान झाला. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या पुरस्काराने माझा सन्मान केल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार. सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली. 
- मंदार हळबे, नगरसेवक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका  

‘सकाळ’ने या पुरस्काराद्वारे समाजातील सकारात्मकतेला दिशा दिली आहे. माझी अशी इच्छा आहे, हे दिशा देण्याचे काम आता थांबू नये; दरवर्षी ‘सकाळ’ने अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करावा, जेणे करून त्यांना आणखी चांगले काम करण्याची 
प्रेरणा मिळेल.
- प्रफुल्ल शाह, संचालक, हॅप्पी होम ग्रुप

सामाजिक, शैक्षणिक; तसेच नागरिकांच्या प्रत्‍येक समस्यांना वाचा फोडणाऱ्या ‘सकाळ’ने केलेले कौतुक हे अधिक काम करण्यासाठी अधिक स्फुरण मिळवून देते. वृत्तपत्राने विविध क्षेत्रांत सामाजिक काम करणाऱ्या लोकांचा केलेला सन्मान ही त्यांनी केलेल्या कामाची पोचपावतीच आहे. 
- विजय जाधव, भिवंडी

उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार वितरण सोहळा आणि त्याचे अत्यंत दिमाखात झालेले सादरीकरण, यामुळे आमच्या माना तर उंचावल्याच; पण यातून अनेकांनी काहीतरी सकारात्मक घेतले असेल हे नक्की. आमच्यासारख्या तरुणांना मान देणारा पुरस्कार आपण प्रदान केला, हे मी माझे भाग्य समजतो. 
- राजेंद्र घोरपडे, भाजप प्रवक्ते, ठाणे जिल्हा

समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाने आपल्या कार्यातून काही करू पाहणाऱ्यांचा गौरव केला ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे. या पाठबळामुळे ज्ञानज्योतीचा प्रकाश अधिकाधिक आयुष्यात पसरवण्याची प्रेरणा मिळाली आहे.
- स्वप्नील गायकर, सचिव, ओम साई शिक्षण संस्था

समाजाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. म्हणूनच जमिनीशी नाळ जोडलेल्या आणि समाजासाठी काही करू पाहणाऱ्यांचा सन्मान ‘सकाळ’ने या निमित्ताने केला. ‘सकाळ’ने माझा सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. या पुरस्कारामुळे अधिकाधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. 
- कॅप्टन आशीष दामले

‘सकाळ’ नेहमीच चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देत असतो. ‘सकाळ’ने समाजसेवेसाठी बळ दिले आणि पुरस्कार प्रदान केला त्याबद्दल आभार. समाजसेवेचे हे व्रत मी असेच कायम ठेवणारअसून, अधिकाधिक लोकांना फायदा होईल असे काम करण्‍यासाठी प्रयत्‍न करेन.
- जयेंद्र कोळी, संस्थापक, आई-बाबा सामाजिक संस्था

नामवंतांच्या रांगेत आपलाही समावेश झाला, याचा आनंद ‘सकाळ’च्या उत्तम ते शोधण्याच्या वृत्तीमुळे शक्‍य झाला.  आमच्या कामाची दखल घेत प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या पुरस्कारामुळे आता स्वतःचा नव्याने शोध घेण्यासाठी हा पुरस्कार नक्कीच उपयुक्त ठरेल. 
- संदीप पाटील, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

आदिवासी आणि दुर्गम भागातील लोकांसाठी समाजकार्य करताना अनेकदा तेथील लोकांचा आक्रोशही सहन करावा लागतो. मात्र, या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ समाजसेवेचा वसा कायम ठेवणे, हे माझ्या जीवनाचे ध्येय मी ठरविले आहे. त्याला अधिक बळ देणारा हा 
पुरस्कार आहे. 
- साकीब गोरे, समाजसेवक

‘सकाळ’ हा वृत्तपत्र समाजमनाचा एक मोठा आरसा आहे. पुरस्कार देऊन जो गौरव केला व आमच्या कामाची दखल घेतली त्यातून एक चांगला संदेश लोकांपर्यंत गेला आहे. ‘सकाळ’च्या स्तुत्य उपक्रमाबद्दल 
मनापासून धन्यवाद.  
- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

पर्यटन क्षेत्रात काम करताना ग्राहकांच्या क्षमतेचा विचार करणारी संस्था चालविण्याचा निश्‍चय केला. ग्राहकांच्या आनंदातच माझा आनंद मानुन त्यांना चांगली सेवा देण्याचे काम आजही कायम आहे. या पुरस्काराने अधिकाधिक आनंद देण्यासाठीचे बळ मिळाले. ‘सकाळ’च्या या पुरस्कारामुळे आनंदात वाढच केली आहे. 
- आत्माराम परब, संचालक, ईशा टूर्स

आपण जे काम करतो ते अत्यंत प्रामाणिकपणे करणे हाच ध्यास कायम मनात होता. त्यामुळे दागिन्यांचा व्यवसाय करताना येणाऱ्या ग्राहकाच्या आनंदातच आपले कार्य 
सत्कारणी लागेल, हेच मनाशी पक्के केले. चांगले काम करण्यासाठी या पुरस्काराने प्रेरणा 
मिळाली आहे. 
- रोहन आत्माराम गोळे, श्री चिंतामणी ज्वेलर्स

‘सकाळ’ वृत्तपत्राने पाणी, स्वच्छता व अवयदान यांसारख्या अनेक वर्षांपासून लोकोपयोगी चळवळी राबविल्या. आता विविध क्षेत्रात नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला, बाब भूषवहच आहे. तळागाळातील लोकांना या सन्मानामुळे अधिक काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
- प्रदीप राका, भिवंडी

एखादे काम मनापासून व सचोटीने केल्यानंतर जेव्हा ‘सकाळ’सारखे वृत्तपत्र त्याची दखल घेतो, त्या वेळी होणारा आनंद अवर्णनीयच. यामुळे अधिक चांगले काम करण्याची उमेद निर्माण झाली आहे. यापुढेही उत्तम काय करण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहणार आहे.
- समीर श्रीनिवास काळे, मॅंगो व्हिलेज, गुहागर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com