सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सामाजिक बांधिलकी नेहमीच दाखविणाऱ्या "सकाळ'ने या कार्यक्रमातही ती जाणीव दाखवली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "सकाळ'चे कौतुक केले.

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई  - गेली वर्षभर कोरोनाच्या संकटात स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कठोर परिश्रम करून जनतेला सुरक्षित ठेवणाऱ्या सर्वसामान्य शवागार कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री या अशा 31 सेवाव्रतींचा गौरव "सकाळ सन्मान-2021' या बहारदार कार्यक्रमात झाला अन्‌ सकाळ माध्यम समूहाच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेमुळे सारेच जण भारावून गेले. 

मुंबईतील प्रभादेवीच्या रवीद्र नाट्यमंदिरात शनिवारी (ता. 30) झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या सर्वांनीच या व पडद्यामागे काम करणाऱ्या अशाच असंख्य अनामवीर कोरोनायोद्‌ध्यांच्या परिश्रमांचा मुक्तकंठाने गौरव केला. तसेच या कोरोनायोद्‌ध्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून असंख्य लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या "सकाळ'च्या या प्रयत्नाचेही कौतुक केले. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांसाठी क्लिक करा

वर्तमानपत्र चालवणे म्हणजे काय दिव्य असते हा अनुभव मलाही आहे. हल्लीच्या "बार्किंग' न्यूज (आरडाओरडा करत दिलेल्या बातम्या) च्या युगात 
बातम्या, लेख देताना त्याबरोबरच सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणे महत्त्वाचे असते. ते जपण्याची बांधिलकी नेहमीच दाखविणाऱ्या "सकाळ'ने या कार्यक्रमातही ती जाणीव दाखवली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "सकाळ'चे कौतुक केले. 
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तेव्हाच्या आमच्या अडचणी सांगितल्या असत्या तर सर्वजण घाबरले असते. तरीही अवसान आणून आम्ही काम केले, वर्तमानपत्रे बंद ठेवावी लागली. तेव्हा "सकाळ'सह सर्वच प्रसारमाध्यमांनी आणि सर्वांनीच सामाजिक जाणीव ठेवून मोलाची कामगिरी केली. आता संकट बरेचसे टळले असले तरी अजूनही इंग्लंडमधील नव्या विषाणूचा मानवजातीला मोठा धोका आहेच. त्यामुळे असे दिवस पुन्हा येऊ नयेत, यासाठी लस घेतल्यानंतरही कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. 

अडकवले की लटकवले 
आपल्याला कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्रीपद देऊन शरद पवार यांनी आपल्याला अडकवले की लटकवले, हे कळत नाही. हे म्हणजे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्याला एकदम मुख्याध्यापक केल्यासारखाच प्रकार आहे, असे ठाकरे यांनी सांगताच सभागृहात एकच हास्यस्फोट झाला. 

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Sakal sanman sohala sakal social commitment is admirable Chief Minister Uddhav Thackeray

Web Title: Sakal Sanman Sohala Sakal Social Commitment Admirable Chief Minister Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..