
विरार - राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन महायुती सत्तेवर अली. सत्तेवर आल्यानंतरही बऱ्याच दिवसापासून पालकमंत्री नेमण्याचे घोंगडे भिजत पडले होते. त्यावर अखेर तोडगा निघाला असून पालघरच्या पालकमंत्रीपदी गणेश यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पालकमंत्री पदी गणेश नाईक यांनी नेमणूक होणार याचे भाकीत सकाळने 17 डिसेंम्बरला केले होते.