esakal | Sakinaka Rape Case : आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

Judgement

Sakinaka Rape Case : आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर (sakinaka rape case) राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. राज्यातील महिलांच्या सुरक्षितेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं झाल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. साकीनाकामध्ये झालेली घटना गंभीर असून या प्रकरणातील गुन्हेगाराला कठोर शिक्ष केली जाईल, तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत देखील चर्चा केली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

साकीनाका येथे एका महिलेवर अत्यंत अमानुष पद्धतीने बलात्कार करण्यात आला. रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये ही भीषण घटना घडली. या बलात्कार पीडित महिलेचा आज दुपारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने मुंबईला हादरवून सोडले आहे.

हेही वाचा: Sakinaka rape case: मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष द्यावं

विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. नराधम आरोपीने बलात्काराच्या बरोबरीने महिलेला रॉडने जखमी केले. आरोपीच्या अत्याचारामध्ये जखमी झालेल्या महिलेची स्थिती गंभीर होती. अखेर आज दुपारी मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली.

loading image
go to top