esakal | Sakianaka rape case update: पीडित महिलेवर अनैसर्गिक अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

Sakianaka rape case update: पीडित महिलेवर अनैसर्गिक अत्याचार

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: साकीनाका येथे एका महिलेवर अत्यंत अमानुष पद्धतीने अत्याचार (Sakianaka rape case) करण्यात आला आहे. मुंबापुरीला (Mumbai) या घटनेने हादरवून सोडले आहे. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. चाकूच्या धाकावर पीडित महिलेवर आरोपीने बलात्कार केला. आरोपीने महिलेवर अनैसर्गिक अत्याचारही केले. या प्रकरणात तक्रारदार असलेल्या सुरक्षा रक्षकाने दोन व्यक्ती महिलेला धमकावत असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला केला होता.

पीडित महिला गुरुवारी रात्री बहिणीच्या घरी गणपतीसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात एकच आरोपी असल्याचे निष्पन्न होत आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर तिच्या गुप्तांगावरही जखमा केल्या. चाकूने वार केले. पीडीत महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

हेही वाचा: US Open: जोकोविचने घेतला बदला, ज्वेरेवचा पराभव करत फायनलमध्ये धडक

नेमकं काय घडलं?

मुंबापुरीत महिलांच्या सुरक्षिततेबद्दल (women security) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साकीनाका भागात (Sakinaka area) टेम्पोमध्ये एका महिलेवर बलात्कार (rape on women) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित महिलेची प्रकृती गंभीर (women serious condition) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहन चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर रॉडसारख्या वस्तुने महिलेला जखमी केले आहे.

loading image
go to top