साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण : आरोपी मोहन चौहानवर आरोप निश्चिती | Sakinaka rape and murder case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण : आरोपी मोहन चौहानवर आरोप निश्चिती

मुंबई : चालू वर्षी सप्टेंबर मध्ये साकिनाका (sakinaka) येथे झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात (rape and murder case) आरोपी मोहन चौहानवर (Mohan chauhan) (45) दिंडोशी सत्र न्यायालयाने (dindoshi session court) गुरुवारी आरोप निश्चित (allegation confirmation) केले. यामुळे लवकरच खटल्याची कारवाई (case action) सुरू होऊ शकेल.

हेही वाचा: मॉरिशियन बांधकाम रँकिंगमध्ये लार्सन अँड टुब्रो आघाडीवर

ऐन गणपतीमध्ये अंधेरीतील साकिनाका येथे आरोपीने पीडीत महीलेची निर्घृण हत्या केली होती. अभियोग पक्षाने त्याच्यावर सहा प्रमुख आरोप ठेवले आहेत. यामध्ये भादंविच्या कलमाअंतर्गत बलात्कार, हत्या, अॅट्रोसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाणसह हत्यारे कायद्यानुसार आरोपांचा समावेश आहे. या आरोपांवर फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.आरोपी चौहानने विशेष न्या एच एस शेंडे यांच्यापुढे सर्व आरोप नाकारले. त्यामुळे आता खटला लवकरच सुरू होऊ शकेल. आरोपी विधी सेवा प्राधिकरण मार्फत वकिल देण्यात आला आहे. अभियोग पक्षाने गुरुवारी ओळखपरेडचा एक अहवालही दाखल केला.

आरोपी पीडित महिलेला ओळखत होता. मात्र ती त्याच्याकडे लक्ष देत नसल्याचा राग डोक्यात ठेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली, असे अभियोग पक्षाने म्हटले आहे. सोमवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे. या घटनेमुळे मुंबई सह महाराष्ट्रात खळबळ माजली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणी तातडीने तपास करुन खटला सुरू करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

loading image
go to top