esakal | साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले - मुंबई पोलिस
sakal

बोलून बातमी शोधा

hemant.jpg

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीविरोधात पुरावे मिळाले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तसंच आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याची सर्व माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले - मुंबई पोलिस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीविरोधात पुरावे मिळाले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तसंच आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याची सर्व माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे. घटनास्थळी पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला आणि आरोपी घटनास्थळावरून कसा गेला यासंदर्भात पुरावे मिळाले आहेत. आरोपीकडून हत्यार जप्त करण्यात आल्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून त्याच्याविरोधात एट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे. हा संवेदनशील गुन्हा असल्यानं स्पेशल कौन्सिल आणि वकीलाची नेमणूक केली आहे. राजा ठाकरे यांच्याकडे प्रकरण दिलं आहे. तपासात तेसुद्धा मार्गदर्शन करत आहेत. डीएनएचे रिपोर्ट येण्यासाठी कालावधी लागेल तेवढाच अन्यथा तपास १५ दिवसात होऊन जाईल. या गुन्ह्याची चार्जशीट एक महिन्याच्या आत दाखल करू अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

हेही वाचा: सोमय्या बिचारे, त्यांना दोष देऊ नका; मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन

दोन घटना घडल्या त्याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या काही मेंबर्सनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल्ड कास्टच्या सदस्यांनी भेट दिली. आज दीड वाजता मुख्यमंत्र्यांसोबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह इतर काहींची बैठक झाली. तपसात गती असून याप्रकरणी आरोपीविरोधात पुरावे मिळाले आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले. पीडित महिलेच्या तीन मुलींना २० लाखांची जाणार आहे. तसंच त्यांना ज्या काही शासकीय योजनांमधून जी मदत करता येईल ती देण्यात येईल अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

loading image
go to top