esakal | साकीनाका प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai crime

साकीनाका प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून २० लाख रुपयांची नुकसान भारपाई जाहीर झाली आहे. या प्रकरणामुळं केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरुन गेला आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणाशी या प्रकरणाची तुलना केली जात असून अमानुषपणे पीडित महिलेवर अत्याचार झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

या भीषण बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित महिला ही अनुसुचित जातीची असल्यानं मुंबई पोलिसांनी आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे. त्याचबरोबर हत्येसाठी आरोपीनं वापरलेलं हत्यारंही पोलिसांनी जप्त केलं आहे. प्राथमिक तपासानुसार पीडितेचा मृत्यू हा तिच्या शरिरभर झालेल्या जखमांमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

त्याचबरोबर रात्रीच्यावेळी निर्मनुष्य असणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी एकट्यानं प्रवास करणाऱ्या महिलांना गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत मदत पुरवण्यात येईल, असंही पोलीस आयुक्त नगराळे यांनी सांगितलं.

loading image
go to top