esakal | साकीनाक्यामध्ये नेमकं काय घडलं? बलात्कार पीडितेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

साकीनाक्यामध्ये नेमकं काय घडलं? बलात्कार पीडितेचा मृत्यू

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबापुरीत महिलांच्या सुरक्षिततेबद्दल (women security) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. साकीनाका भागात बलात्कार झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार (nirbhya case) प्रकरणाची आठवण करुन देणारी भीषण घटना मुंबईत साकीनाका इथे काल घडली. साकीनाका भागात (Sakinaka area) टेम्पोमध्ये एका महिलेवर बलात्कार (rape on women) करण्यात आला. अत्यंत अमानुष पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आला होता. पीडित महिलेची प्रकृती गंभीर (women serious condition) होती. अखेर तिचा मृत्यू झाला आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर रॉडसारख्या वस्तुने महिलेला जखमी केले होते.

शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी काही तासातच आरोपी मोहन चौहानला अटक केली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. खैरानी रोडवर आरोपी महिलेला मारहाण करत असल्याचा पोलीस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी सकाळी फोन आला. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी महिला तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पीडित महिलेला लगेच जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: 'लालबाग राजा'च्या मंडपातून कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर

प्राथमिक तपासानुसार या महिलेवर बलात्कार करण्यात आला तसेच तिला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पोमध्ये ही घटना घडली. टेम्पोच्या आत रक्ताचे डागही आढळले आहेत. आयपीसीच्या ३०७ हत्येचा प्रयत्न, ३७६ बलात्कार या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

loading image
go to top