esakal | रात्री 'लालबाग राजा'च्या मंडपातून कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

Lalbaugcha Raja

'लालबाग राजा'च्या मंडपातून कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: लालबागचा राजा (lalbaugh raja) मंडळातील कार्यकर्त्यांना काल रात्री मंडपातून (remove Volunteers) पोलिसांनी बाहेर काढलं. लालबागच्या राजाच्या मंडपात मंडळाचे पन्नास कार्यकर्ते जागरण करत होते. त्या जागरण करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढलं. या संदर्भात मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या मध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे.

लालबागच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी खूप फिरून जावं लागतं आहे. त्यामुळे लोकांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातून काय मार्ग काढता येईल, या संदर्भात पोलीस प्रशासन आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात आपसात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: निवृत्त एसीपी असल्याचे खोटे सांगत शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार

कालही जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'लालबाग राजा'च्या (lalbaugh raja) प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब झाला होता. लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी (local traders) आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद (shops close) केली होती. त्यामुळे वाद झाला होता.

हेही वाचा: कृष्णाला मामा बरोबर भांडण मिटवायचय, पण मामीला त्याचा चेहराही पाहायचा नाही

लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भावीक लालबागमध्ये येणार नाही. मग स्थानिक रहिवाश्यांची दुकानं का बंद करण्यात आलीत, असा प्रश्नं लालबाग मार्केट मधील रहिवाशी विचारत होते.

loading image
go to top