esakal | साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या - रामदास आठवले
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athwale

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या - रामदास आठवले

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : साकिनाका (Sakinaka) येथील महिलेवर बलात्कार (woman rape case) करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा (Death Sentence) द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. अंधेरी साकिनाका येथे बलात्कार करून अमानुष मारहाण झालेल्या महिलेला राजावाडी रुग्णालयात (Rajawadi hospital) दाखल केल्यानंतर आज तिचे दुःखद निधन झाल्याचे कळताच आठवले यांनी राजावाडी रुग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांची भेट घेतली.

हेही वाचा: सामान्य स्त्रीयांसाठीही कणव दाखवा; चाकणच्या ताईंना भाजपचा टोला

यावेळी माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी याप्रकरणी जलद गती न्यायालयात खटला चालवून 6 महिन्यात आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखवेत आणि साकिनाका येथे महिलेवर झालेला अमानुष अत्याचार बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्या साकिनाका पोलीस ठाणे येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आठवले यांनी दिली.

सदर पीडीत महिला जर दलित समाजाची असेल तर या प्रकरणी ऍट्रोसिटी ऍक्ट सुद्धा लावण्यात यावा. पीडित महिला कोणत्याही समाजाची असो ती महिला आहे तिला न्याय मिळाला पाहिजे. पीडित मृत महिलेच्या कुटुंबियांना राज्य शासनाने सांत्वनपर 10 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.

loading image
go to top