esakal | सामान्य स्त्रीयांसाठीही कणव दाखवा; चाकणच्या ताईंना भाजपचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Sheetal-Gambhir-Desai

सामान्य स्त्रीयांसाठीही कणव दाखवा; चाकणच्या ताईंना भाजपचा टोला

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : चाकणच्या किल्ल्यात (chakan Fort) राहणाऱ्या ताईंनी फक्त बड्या व्यक्तींवर झालेल्या अन्यायालाच (Woman victimization) वाचा फोडू नये तर त्याबरोबरच सामान्य स्त्रीयांवर (Common Women's) होणाऱ्या अत्याचाराचीही गंभीर दखल घ्यावी, यात `पक्ष`पात करू नये, असा टोला भारतीय जनता पक्ष (BJP) महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (Sheetal Desai) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना नाव न घेता लगावला आहे.

हेही वाचा: रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लाॅक

छोट्या घरातील किंवा मोठ्या घरातील अशा कोणत्याही स्त्री वर झालेला अत्याचार कोणीही सहन करता कामा नये. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही महिलांवर अत्याचार करू नये. या अत्याचारांचा निषेध करण्यात भेदभाव आणि `पक्ष`पात करणाऱ्या महिलांचे कृत्य लाजिरवाणे आहे. अशा अत्याचारांविरोधात सर्वच पक्षांमधील मोठमोठ्या महिला नेत्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जावे, असेही आवाहन श्रीमती देसाई यांनी केले आहे.

नुकत्याच विदर्भातील एका भाजप लोकप्रतिनिधीच्या सुनेवर अन्याय झाल्याची कैफियत चाकणकर यांनी मांडली होती. नंतर त्या लोकप्रतिनिधीने सुनेचे मुलाशी विधिवत लग्नही लावून दिले होते. तर नुकताच नगरमधील महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोपही चाकणकर आपल्या ट्वीट मार्फत केला आहे. ही अशा प्रकारची राजकीय हिंसा निषेधार्ह आहे, भाजप महिला मोर्चा त्याचे जराही समर्थन करणार नाही. मात्र तसेच स्वपक्षीय कार्यकर्त्यांचा निषेध करण्याचे धाडसही चाकणच्या किल्लेदार ताईंनी दाखवावे, असेही श्रीमती देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: Sakinaka Case: नक्की काय घडलं याबाबत अनभिज्ञ आहोत- मुंबई पोलिस आयुक्त

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून मोठ्या संख्येने महिलांवर अत्याचार सुरु झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते सतत करीत आहेत. काल मुंबईतही एका तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यात तिचा आज मृत्यू झाला, या तरुणीला श्रद्धांजली वाहतानाच असे अत्याचार सहन न करण्याचा निर्धार सर्व पक्षीयांनी केला पाहिजे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर विजयी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे भाजपविरोधात मोठा हिंसाचार केला होता. यात अनेक स्त्रीयांवर बलात्कार, हत्या, हिंसाचारही झाला. या हिंसाचाराचा कोणीही निषेध केल्याचे आढळले नाही. अशा प्रकारे निवडक घटनांमध्येच महिलांवरील हिंसाचाराचा निषेध करणाऱ्या पक्षपाती महिलांमुळेच राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय महिला नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील महिला हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी सरकारकडे जाण्याची गरज असल्याचेही देसाई यांनी म्हटले आहे.

loading image
go to top