ठाणे जिल्ह्यात शिवभोजन थाळी विक्रीत वाढ 

राहुल क्षीरसागर
मंगळवार, 14 एप्रिल 2020

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपयायोजन करण्यात येत आहेत. तसेच गर्दीमुळे संसर्ग होऊ नये, याकरिता लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचे काय झाले, याबाबत नागरिकांच्या मनात विविध प्रश्न डोकावू लागले आहेत. मात्र, या आजाराचा शिवभोजन थाळीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत असून, नेहमीपेक्षा लॉकडाऊनच्या कालावधीत शिवभोजन थाळीच्या संख्येत 500 ते 600 ने वाढ झाल्याची माहिती शिधावाटप उपनियंत्रक अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपयायोजन करण्यात येत आहेत. तसेच गर्दीमुळे संसर्ग होऊ नये, याकरिता लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचे काय झाले, याबाबत नागरिकांच्या मनात विविध प्रश्न डोकावू लागले आहेत. मात्र, या आजाराचा शिवभोजन थाळीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत असून, नेहमीपेक्षा लॉकडाऊनच्या कालावधीत शिवभोजन थाळीच्या संख्येत 500 ते 600 ने वाढ झाल्याची माहिती शिधावाटप उपनियंत्रक अधिकाऱ्यांनी दिली.

क्लिक करा : धक्कादायक, वापरलेल्या मास्कची पुन्हा होतेय विक्री

महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला 232 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेत, उपाययोजन करण्यात येत आहेत. या आजाराच्या धास्तीने नागरिक घरातच बसून असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे पहायला मिळते.

मात्र, यात सरकारी अनुदानातून सुरू असलेल्या शिवभोजन थाळीचे काय झाले, आदी विविध शंका कुशंकांचे काहूर नागरिकांच्या मनात माजत होते. मात्र, या शिवभोजन थाळीवर कोरोना या आजाराचा कोणाताही परिणाम झाला नसल्याच्या माहिती ठाणे शिधावाटप फ परिमंडळ विभाग उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी दिली. 

क्लिक करा : आता मुंबईच्या समुद्रातही आयसोलेशन सेंटर

ठाणे जिल्ह्यात सात ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी गरीब, गरजू जनतेला सवलतीच्या दरात फक्त 10 रुपयात भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या केंद्रांवर दुपारी बारा ते दोन या कालावधीतच जेवण मिळत आहे. प्रत्येक केंद्राला प्रतिदिन 150 थाळीचे उद्दिष्टे देण्यात आली आहेत.

त्यानुसार प्रतिदिन दोन हजार 700 थाळी विक्री होत होती. मात्र, लॉकडाऊनमुळे हॉटेल, खानावळी, दुकाने यांसह विविध आस्थापने बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गरीब गरजू नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी 10 रुपयांवरून ही थाळी 5 रुपयात देण्यात येत आहे. लॉकडाऊन पूर्वीपेक्षा या थाळीत 500 ते 600 ने वाढ झाली असून प्रतिदिन तीन हजार 500 थाळी विक्री होत असल्याची माहिती वंजारी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sales of Shiv Bhoja plate increase in Thane district