सलमान खान, त्याचे शर्टलेस सीन्स आणि 'असा' सुरु झाला हा ट्रेंड..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 December 2019

सलमानचा शर्टलेस सीन आणि सिनेमा हिट  

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान (Bhaijan), सलमान खान. आज सलमान खानचा बर्थडे. आज भाईचा बर्थडे आहे त्यामुळे सलमान खान (Salman Khan ) बद्दल एक अनोखी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

सलमान खान त्याचे विविध सिनेमे, त्यामधील त्याचा अनोख्या भूमिका, सलमान खान ची स्टाईल यामुळे कायम चर्चेत असतो. सलमान खानची स्टाईल कायम सर्वांना भुरळ घालते आणि अनेकजण त्याचं अनुकरण देखील करतात.  

महत्त्वाची बातमी : 'बर्नोल द्या' असं मी सांगणार नाही, आदित्य ठाकरेंचे राजकीय बाण

आता सलमान खानच्या स्टाईलबद्दलच बोलायचं झालं तर भाईजान सलमानची सर्वात फेमस स्टाईल म्हणजे त्याचं शर्टलेस होणं. सलमानच्या प्रत्येक सिनेमामध्ये एक तरी सीन हा शर्टलेस असतोच. सलमान खान आणि शर्टलेस सीन हे त्याच्या सिनेमाचं समीकरण झालंय. मात्र तुम्हाला सलमान खान ची शर्टलेस होण्याची सुरवात कधी आणि कुठे झाली हे तुम्हाला माहितीये का ?

महत्त्वाची बातमी : एका दिवसात संसार आला रस्त्यावर

सलमान ची शर्टलेस होण्याची सुरवात तब्बल 21 वर्षांपूर्वी झाली. सर्वात आधी सलमान खान ला 'प्यार किया तो डरना क्या' ( Pyar Kiya Toh Darna Kya?) या सिनेमामध्ये शर्टलेस पाहायला मिळाला. 'प्यार किया तो डरना क्या' ( Pyar Kiya Toh Darna Kya?) हा सिनेमा 1998 मध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा खूप हिट झाला होता. मात्र या सिनेमापेक्षा त्यातील  'ओ ओ जाने जाना' हे गाणं लोकांना चांगलंच भावलं. 

महत्त्वाची बातमी : स्वतःच जेट विमान असणाऱ्या माधुरीने विकला 'तो' बंगला

आज या गाण्याला २१ वर्ष पूर्ण झालीयेत. मात्र अजूनही लोकांच्या तोडावर हे गाणं असतं. सलमान खानची शर्टलेस होण्याची सुरवात देखील याच गाण्यापासून सुरु झाली. आता तुम्ही म्हणाल कदाचित स्क्रिप्ट ची मागणी असल्याने सलमान ने तसं केलं असेल. तर तसं नाहीये. सलमान खान ने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या गाण्यात मला शर्ट घालायचा होता. मात्र तो शर्ट लहान असल्याने तो  सलमान ला होत नव्हता. या सिनेमाचं दिग्दर्शन सोहेल खान करत होता. सोहेल खान याने सलमानला स्टेजवर बिना शर्ट जायला सांगितलं होतं.   

महत्त्वाची बातमी : गृहिणींसाठी खुशखबर! पालेभाज्यांच्या भावात झाली इतकी घसरण..

याचबरोबर सलमान खान ला स्वतःला 'ओ ओ जाने जाना' हे गाणं प्रचंड आवडतं. हे गाणं खरतर 'जब प्यार किसी से होता है' या सिनेमासाठी लिहिलं गेलं होतं. मात्र त्या सिनेमाच्या निर्मात्यांनी हे गाणं रिजेक्ट केलं होतं. सलमानला हे गाणं आवडलं असल्याने त्यांनीच हे गाणं होम प्रोडक्शन 'प्यार किया तो डरना क्या' मध्ये वापरण्याचा निर्णय घेतला. 

WebTitle : salman khan shirtless shots was an accidents know full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan shirtless shots was an accidents know full story