सलाम 'त्यांच्या' कार्याला ! 'ते' सुद्धा करताय जीव धोक्यात घालून काम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 मे 2020

कोरोनाच्या आव्हानास सामना करणाऱ्यात अनेकांचे कौतुक होते, पण त्यांच्याइतकेच आव्हानात्मक काम करुनही काही जण दुर्लक्षित आहेत. जैववैद्यकीय कचरा गोळा करण्याचे आव्हानात्मक काम करणारे कर्मचारीही धोका पत्करून काम करत आहेत.

मुंबई : कोरोनाच्या आव्हानास सामना करणाऱ्यात अनेकांचे कौतुक होते, पण त्यांच्याइतकेच आव्हानात्मक काम करुनही काही जण दुर्लक्षित आहेत. जैववैद्यकीय कचरा गोळा करण्याचे आव्हानात्मक काम करणारे कर्मचारीही धोका पत्करून काम करत आहेत. कंटेनमेंट झोन तसेच विलगीकरण कक्षातून त्यांना जैववैद्यकीय कचरा गोळा करावा लागत आहे.

मोठी बातमी ः मुंबईकरांनो सावधान ! कारण ही आकडेवारी पाहून "मुंबईचं काय होणार" असाच प्रश्न उपस्थित होतोय

कोरोना रुग्णांवरील उपचारानंतरचा जैववैद्यकीय कचरा देवनार येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विल्हेवाट लावण्यासाठी नेण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते. देवनार येथील या केंद्रात 29 मार्चपासून या प्रकारच्या 11 टन जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. मात्र हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामही कमी धोक्याचे नाही. त्यांनाही पीपीई किट घालून हा कचरा जमा करण्याचे काम करावे लागत आहे.

मोठी बातमी ः कोरोनाचा विळखा आणखी आवळला; नव्या भागांत आढळताय रुग्ण

जैववैद्यकीय कचरा संकलन करून त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम धोक्याचे असल्याची या कर्मचाऱ्यांना जाणीव होती. त्यामुळे सुरुवातीस  धास्ती वाटत होती. पण काम सुरु केल्यावर ती दूर झाली आणि त्याची आता सवय झाल्याचे कर्मचारी सांगतात. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरलेले साहित्य व त्यातून निर्माण झालेला कचरा पिवळ्या बॅगेत गोळा केला जातो. ती बॅग चांगल्या प्रकारे बंद करून तिचे निर्जंतुकीकरण केले जाते आणि विशेष वाहनाने ते देवनार येथील केंद्रात प्रक्रिया करण्यासाठी पाठवले जाते. 

मोठी बातमी ः मुंबईतील चार स्थानकात रेल्वेडब्यांमध्ये विलगीकरण कक्ष 

सुरुवातीला हे काम प्रत्येकाला रुचले नव्हते. घरच्यांचाही विरोध होता. पण त्यांना हे आपल्या कामाचा भाग आहे, असे समजावून सांगितले आहे. त्यातील प्रत्येकजण घरी गेल्यावरही स्वच्छतेची खबरदारी घेतो. ``पीपीई किट परिधान केल्यावर मोबाईललाही हात लावत नाही. त्यापूर्वीच घरी फोन करतो. मी घरी येण्याच्या सुमारास त्या सर्वांना घराबाहेर जाण्यास सांगितले जाते. घराबाहेर गरम पाण्याची बादली तसेच साबण ठेवण्यास सांगतो. मी त्यात माझे कपडे भिजवतो आणि अंघोळीला जातो, त्यानंतरच आमच्या घरातील परत येतात," असे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले. 

सकारात्मक बातमी ः मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदा सतावणार नाही 'ही' कटकट

घरातच विलगीकरण करणारे अनेक जण पुरेशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे काहीवेळा जैववैद्यकीय कचरा ओसंडून वाहते. ती बांधण्याचा प्रयत्न केल्यास, त्यातून काही गोष्टी बाहेर पडतात. त्यामुळे हे कामही अनेकदा वाढते, अशीही तक्रार होत आहे. मुंबईतील विविध प्रभागात हे कर्मचारी आहेत. कंटेनमेंट असलेल्या प्रभागात हे काम जास्त आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे दर आठवड्याला तापमान घेतले जात आहे. त्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायची तसेच त्याची लक्षणे काय आहेत, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salute to employees collectiong biomedical waste from hospitals