esakal | मुंबईकरांनो सावधान ! कारण ही आकडेवारी पाहून "मुंबईचं काय होणार" असाच प्रश्न उपस्थित होतोय
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो सावधान ! कारण ही आकडेवारी पाहून "मुंबईचं काय होणार" असाच प्रश्न उपस्थित होतोय

कोरोनाने अद्याप शिखर गाठलेलेले नसल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहे. मात्र, गेल्या अवघ्या 8 दिवसात 1 हजाहून अधिक नव्या वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आळले आहे.

मुंबईकरांनो सावधान ! कारण ही आकडेवारी पाहून "मुंबईचं काय होणार" असाच प्रश्न उपस्थित होतोय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाने अद्याप शिखर गाठलेलेले नसल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहे. मात्र, गेल्या अवघ्या 8 दिवसात 1 हजाहून अधिक नव्या वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आळले आहे. मुंबई महानगर पालिकेने 6 हजारच्या आसपास हायरिस्क व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. तर 1 लाखाच्या आसपास नागरीक घरात एकांतात आहेत. यांच्यामधून  रुग्ण आढळत असले तरी नव्या वस्त्यांमध्येही रुग्ण सापडू लागले आहेत.

2 एप्रिल रोजी 1हजार 576 ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले होते. तर, 8 एप्रिलच्या दुपार पर्यंत हा आकडा 2 हजार 646 पर्यंत पोहचला आहे. अशी माहिती महापालिकेने जाहीर केली आहे. झोपडपट्ट्यामध्येही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

सर्वात मोठी बातमी ! मुंबई पुण्यात चौथा लॉकडाऊन? स्वतः मुख्यमंत्र्यांचे दिलेत संकेत...
 

प्रतिबंधित वस्त्या आणि रुग्णांचा चढता आलेख 

  • दिवस - प्रतिबंधित वस्त्या -- एकूण रुग्ण 
  • 29 एप्रिल --1391--9532
  • 30एप्रिल --1459---10030
  • 2 मे --1576 ---- 10905 
  • 8 मे ---2646---13 287

2 मे रोजी 903 झोपडपट्ट्या आणि चाळीत कोरोनाचे रुग्ण होते. तर आज 1497 झोपडपट्ट्या चाळीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. साधारण तीन रुग्ण सापडल्यावर एखादी वस्ती, चाळ किंवा इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते. मात्र, मुंबईत एक रुग्ण आढळल्यानंतर ठिकाण सिल केले जात आहे.

see the increasing graph of contentment zones in mumbai read full news

loading image
go to top