esakal | समाजवादी पार्टी BMC निवडणुकीसाठी सज्ज | वाहानतळे मोफत करण्याचा ठराव
sakal

बोलून बातमी शोधा

समाजवादी पार्टी BMC निवडणुकीसाठी सज्ज | वाहानतळे मोफत करण्याचा ठराव

  महानगर पालिकेच्या निवडणुकीला दोन वर्षाचा अवकाश असताना सर्वच पक्षांनी आता पासूनच तयारी सुरु केली आहे. या तयारीत समाजवादी पक्षही मागे राहीलेली नाही.

समाजवादी पार्टी BMC निवडणुकीसाठी सज्ज | वाहानतळे मोफत करण्याचा ठराव

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई  :  महानगर पालिकेच्या निवडणुकीला दोन वर्षाचा अवकाश असताना सर्वच पक्षांनी आता पासूनच तयारी सुरु केली आहे. या तयारीत समाजवादी पक्षही मागे राहीलेली नाही. निवडणुक नजरे समोर ठेवून समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी मुंबईतील सर्व वाहानतळे मोफत करण्याची ठरावाची सुचना महासभेत मांडली आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महानगर पालिकेची 29 बहुमजली वाहानतळे असून त्यात 40 हजारच्या आसापसा वाहाने उभी करण्याची सोय आहे. त्याच बरोबर रस्त्यावरील वाहानतळे शंभरच्या आसपास आहे. मात्र, या वाहानतळावर चार चाकी वाहानांच्या पार्किंगसाठी तासाला 20 ते 70 रुपये शुल्क आकारले जात.काही दिवसांपुर्वी जेकब सर्कल येथील वाहानतळासाठी स्थानिक रहिवाशांकडून तासाला 70 रुपये शुल्क आकारण्याचा प्रकार घडला होता. या हिशोबाने रहिवाशांना महिन्याकाठी 80 हजार रुपये फक्त पार्किंगासाठी मोजावे लागणार होता. रईस शेख यांनी हा मुद्दाही उपस्थीत केला. त्यानंतर आता सर्वच वाहानतळे मोफत करण्याचा ठराव त्यांनी महासभेत मांडला आहे. या ठरावाच्या सुचनेवर डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कामाकाजात निर्णय घेण्यात येईल.
वाहानतळांसाठी आकारले जाणारे शुल्क प्रचंड आहे.नागरीकांना वाहनतळासारखी सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे. मात्र,त्यातून नफा मिळवणे हे योग्य नाही.त्यामुळे पालिकेने वाहानतळाच्या धोरणात बदल करुन ही वाहानतळे नागरीकांना मोफत उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.असेही त्यांनी या ठरावाच्या सुचनेत नमुद केले आहे.वाहानतळाच्या शुल्कात पाच वर्षांपुर्वी सात ते आठ पटीने वाढ करण्यात आली आहे.त्यावेळी नागरीकांना खासगी वाहानांचा वापर करुन सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे ही अपेक्षा होती.असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मा. गो. वैद्य यांचे निधन | 'देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा स्‍वयंसेवक हरपला' - सुधीर मुनगंटीवार

वाहानतळांचे शुल्क
- पालिकेने वाहानतळांची विभागणी तीन श्रेणीत केली आहे.यात, ए श्रेणी ही व्यावसायिक परीसरातील वाहानतळांसाठी त्यांचे शुल्क सर्वाधिक आहे.तर,त्या खालोखाल बी श्रेणी ही कमी वर्दळीच्या रेल्वे स्थानकांच्या जवळच्या परीसरातील वाहानतळांसाठी आहे.त्यानंतर सी श्रेणीत रहिवाशी परीसरातील वाहानतळांसाठी आहे.
-मुंबईचे अशा तीन श्रेणींमध्ये विभाजन करणेच अवघड आहे.जेबक सर्कल येथील वाहानतळाबाबतही अशीच समस्या निर्माण झाली होती.सुरवातील हे वाहानतळ सी श्रेणीत होते.त्यानंतर अचनाक त्याचा समावेश ए श्रेणीत करण्यात आला होता.मात्र,या भागात निवासी लोकसंख्या जास्त असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता.

Samajwadi Party ready for BMC elections Resolution to make the parking lot free

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

loading image