

Samajwadi Party Manifesto for Municipal Election
ESakal
मुंबई : महापालिकेची सत्ता मिळाल्यास शहरातील नागरिकांना मूलभूत व दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन समाजवादी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. अत्याधुनिक रुग्णालये, सुसज्ज महापालिका शाळा, २४ तास पाणीपुरवठा आणि चांगल्या दर्जाचे रस्ते ही पक्षाची प्रमुख प्राधान्ये असतील.