चिपळ्या वाजवायची ही वेळ आहे का? सामनातून फडणवीसांना टोलेबाजी

चिपळ्या वाजवायची ही वेळ आहे का? सामनातून फडणवीसांना टोलेबाजी
Updated on

मुंबई- शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस आणि त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे, अशा शब्दात सामनात टोलेबाजी करण्यात आली आहे.

सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?, असा सवालही उपस्थित सामनाच्या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’ श्री. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत.

मोठी बातमी कोविड मृतदेहांचा खेळ मांडला; गायकवाडांचा मृतदेह सोनावणेंकडे, सोनावणे मात्र जिवंतच..

अग्रलेखात फडणवीसांवर तिरकस टोलेबाजी

शरद पवार हे शिष्टाई करण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले. तीन पक्षांत समन्वयाचा अभाव असून पडद्यामागे बरेच काही सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सगळय़ा रिपरिप बातम्यांत काडीमात्र तथ्य नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून राज्यात ठाकरे सरकार अवतरले आहे. शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. त्या प्रत्येक भेटीत कसली शिष्टाई असणार?, असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.

मुंबई पोलिस दलातील बदल्यांचा गोंधळ झाला आणि त्या बदल्यांतून अविश्वासाचे वातावरण उघड झाले, असे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यात तथ्य आहे असे वाटत नाही आणि त्याबाबत मनधरणी वगैरे करण्यासाठी गृहमंत्री देशमुख पवारांना घेऊन ‘मातोश्री’वर पोहोचले, असे सांगणे आणि छापणे हेच मुळी मानसिक गोंधळाचे लक्षण आहे. दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल.

चिनी सैन्याने गलवान खोऱयात माघार घेतली, पण सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस आणि त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे.

VIDEO : रोबोट 'गोलर' रुग्णांच्या सेवेत दाखल; कोरोना योद्धांची जोखीम कमी होणार

कोरोना हे देशावरील संकट आहे. त्यामुळे या लढाईत लहानसहान फुसकुल्या सोडून वातावरणात दुर्गंधी आणण्याचे काम कोणी करू नये. विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षण असू शकते. त्यांना काही चुकीचे किंवा धूसर दिसत असेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करणे आणि चष्म्याचा नंबर बदलून घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे आणि त्याबाबत विरोधी पक्षाने हेळसांड करू नये.

चांगल्या विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे आणि फडणवीस, दरेकर हे विधिमंडळातले दोन्ही विरोधी पक्षनेते आता त्यांच्या पद्धतीने चांगले काम करीत आहेत. पदाची प्रतिष्ठा त्यांनी राखावी इतकीच माफक अपेक्षा. विरोधी पक्षनेत्यांनी संकट काळात सरकारला विधायक सूचना कराव्यात. कुठे त्रुटी दिसत असतील तर त्या दुरुस्त करून लोकांना सेवासुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घ्यावा, पण सरकार कोरोनासंदर्भात जे अचाट काम करीत आहे, त्या कामातली फक्त छिद्रे शोधण्याच्या मोहिमा राबवू नयेत.

samana targets opposition leader devendra fadanavis current politics in state

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Clouds Arabian Sea mumbai kerala goa karnataka maharashtra rain
Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department
Rural Road Network Set for Expansion as Cabinet Clears 6,429 Crore Infrastructure Plan
₹36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility
Marathi News Esakal
www.esakal.com