Sambhaji Bhide :"कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलतो"; संभाजी भिडेंकडून पत्रकार महिलेचा अपमान

संभाजी भिडे आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते, यावेळी एका महिला पत्रकाराशी बोलताना हा प्रकार घडला.
Sambhaji-Bhide
Sambhaji-BhideSakal

मुंबई : कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांच्याशी एका महिला पत्रकारानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेनं अशा शब्दांत भिडे यांनी बोलण्यास नकार दिला. पण हा एका महिलेचा अपमान असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Sambhaji Bhide insults female journalist at Mantralaya Mumbai)

Sambhaji-Bhide
BJP: मतांसाठी भाजपकडून कोरोनाचा लसीचं राजकारण; नड्डा म्हणाले, मोदींनी लस बनवून तुमचं...

साम टिव्हीच्या महिला पत्रकारानं संभाजी भिडेंना प्रश्न विचारला की, "तुम्ही आज मंत्रालयात आला होतात तुम्ही कुणाची भेट घेतली?" यावर भिडे म्हणाले, "तू आधी टिकली लावं, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाहीए. तू कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो"

Sambhaji-Bhide
Viral Video: सरकारी शाळेत दारु-कबाब पार्टी; व्हिडिओ व्हायरल अन् मुख्याध्यापक निलंबित

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या, "मुळात बाईनं टिकली लावायची की नाही हा तिचा वैयक्तिक अधिकार आहे. ती कुठल्या धर्माची आहे हे महत्वाचं नाही. कारण कुठल्या धर्मात जन्माला येताना धर्म मागून जन्माला येत नसतं. भिडे गुरुजींचं कुठे मनावर घेता, ते आता म्हातारं माणूस झालेले आहेत. ते साठी बुद्धी नाठी म्हटलं तरी चालेल, अशा माणसांचे बाईटच घेऊ नयेत. हे महिलांना अपमान करत आहेत, पूर्वीची प्रथा ते परत आणू इच्छित आहेत"

Sambhaji-Bhide
China-Pakistan: भारतासाठी धोक्याची घंटा? CPECचा होणार विस्तार, पाक-चीनची मान्यता

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, "संभाजी भिडे यांनी कोणत्या धर्माचं पालन करावं, कोणता धर्माची आचारसंहिता मानावी हा सर्वस्वी भिडे यांचा प्रश्न आहे. पण भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण तीन कलम १९ मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या धर्माप्रमाणं राहण्याचा, आचरण करण्याचा स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कुठलीही वेशभुषा करावी यावर इतर कोणी भाष्य करु नये. हा प्रकार निषेधार्ह आहे. याद्वारे तुम्ही एखाद्याच्या आचार स्वातंत्र्याचा घाला आहे"

Sambhaji-Bhide
Gautami Patil: लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली...

संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले म्हणाले, कुठल्याही धर्मात किंवा संस्कृतीत महिलांचा अनादर करणं हे बसत नाही. महिलांचा सन्मान करणं हीच आपली संस्कृती आहे. महिलांचा सन्मान केला जावा हीच आमची भूमिका आहे. पण ते कशामुळं असं बोलले हे मला सांगता येत नाही. त्यामुळं ते जे बोलले आहेत ते अयोग्य बोलले आहेत, त्यामुळं या गोष्टीचं आम्ही कदापी समर्थन करणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com