Gautami Patil: लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautami Patil: लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली...

Gautami Patil: लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली...

Gautami Patil: गौतमीच्या अदांनी घायाळ झालेल्या प्रेक्षकांनी मिरज तालुक्यातील बेडग गावात अक्षरशः हैदोस घातला होता.लोकांना मैदानात बसायला जागा भेटली नाही. म्हणून थेट शाळेच्या छतावरच चढले. गर्दीच्या हुल्लडबाजीत शाळेची कौलं फुटली. शाळेतील कंपाऊंडचं नुकसान केलं. काही प्रेक्षक गौतमीची लावणी पाहण्यासाठी चक्क झाडावर चढले होते.

हेही वाचा: Gautami Patil: 'सगळ्या तारखा गेल्या, हा महिना पूर्ण बूक' गौतमीनं सांगून टाकलं

प्रेक्षकांच्या वजनाने अनेक झाडंही मोडली. त्यामुळ वाद निर्माण झाला होता. आश्चर्याकारक गोष्ट म्हणजे ज्या परिसरात लावणी कार्यक्रम होता त्याच परिसरात एक मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर बुधवारी गौतमा पाटीलने पत्रकार परिषद घेवून झालेल्या प्रकाराशी माझा काही संबंध नाही. ते वयस्कर होते आणि त्यांच्या मृत्यूने मलाही वाईट वाटलं आहे. मला अंदाजच नव्हता की एवढा विषय होईल. मला कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. त्यामुळे मी माझं काम केले.

हेही वाचा: Gautami Patil: 'सगळ्या तारखा गेल्या, हा महिना पूर्ण बूक' गौतमीनं सांगून टाकलं

तर तिने तिच्या बद्दल बोलताना सांगितस की मी कोल्हापूर ची नाही. तर धुळ्याची आहे, लोकं माझ्या बाबत अफवा पसरवत आहेत. शिंदखेडा हे माझं मूळ गाव आहे. माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांनी मला आणि आईला सोडलं. घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मी आधी बॅक स्टेज डान्सर म्हणून काम केले. त्यानंतर मी लावणीकडे वळाले.

एका कार्यक्रमात माझ्या कडून जी चूक झाली होती ती मी मान्य केली. डान्सच्या फ्लो मध्ये झालेल्या चुकांमुळे मी सगळ्यांची माफी मागते. त्या व्हिडिओ नंतर मी माझ्या डान्स मध्ये बदल केले आहेत. सांगलीच्या गोष्टीवरून मला वाईट वाटले. मी माझं काम केले पण मला अशी काही गोष्ट होईल याची कल्पना नव्हती. शो संपल्यावर मला कळलं की तिथल्या एका माणसाचा मृत्यू झाला.

टॅग्स :marathi lavani