MPSC ची परीक्षा होऊ देणार नाही; राज्यस्तरीय बैठकीतून मराठा समाजाचा सरकारला कडक इशारा

शरद वागधरे
Wednesday, 7 October 2020

MPSC च्या परीक्षा शासनाने घेतल्यास होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार राहील असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय.

मुंबई : MPSC च्या परीक्षा शासनाने घेतल्यास होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार राहील असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय. आज मराठा समाजाच्या वतीने एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केलं गेलेलं. यावेळी बोलताना संभाजी राजे छत्रपती यांनी सरकारला हा इशारा दिलाय. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मराठा आरक्षणासाठीच्या येत्या काळातील रणनितीबाबत आज महत्त्वाची बैठक नवी मुंबईत पार पडली  

या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाच्या विविध संघटनांचे राज्यभरातून प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीचे आयोजन माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केले होते. ही  बैठक सुमारे चार तास सुरू होती. त्यामध्ये राज्यातील मराठा समाजच्या समनव्ययकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महत्त्वाची बातमी : तब्बल ९ अटींवर रिया चक्रवर्तीला झाला जामीन मंजूर, अटींची पूर्तता न झाल्यास रद्द होऊ शकतो जामीन

यावेळी संभाजी राजे छत्रपती म्हणाले की, मी शिव, शाहूंचा वंशज असून अठरा पगड जातीचे प्रतिनिधीत्व करतो. मात्र मराठा समाज वंचित राहिला आहे. मी मराठा समाजचा नेता नसून घटक आहे. मराठा समाजाच्या समन्वयकाच्या खांद्याला खांद्या लावून काम करणार आहे.

मराठा समाजाच्या सर्व आमदारांनी समाजाच्या व्यथा त्यांच्या मंत्र्यांना सांगाव्यात. राज्यपालांच्या मधुमातून राष्ट्रपतींना सांगून विशेष कायद्यानुसार राष्ट्रपती हे समाजाला दिलासा देऊ शकतात. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांशी बोलावं. आरक्षण मिळवून देण्याची जवाबदारी सर्व आमदारबरोबर राज्य सरकारची देखील असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षा घेतल्यास मराठा समाजातील तरुणाचं मोठया प्रमाणत नुकसान होणार आहे. तसेच राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने परीक्षा देणाऱ्या विध्यार्थीचा देखील सुरक्षेचा प्रश्न भयंकर आहे . सदर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने तत्काळ घ्यावा अन्यथा एमपीएससी परीक्षा केंद्र बंद पाडू व होणाऱ्या नुकसनास शासन जवाबदार असेल असा इशारा संभाजी राजे  यांनी दिला.

( संपादन - सुमित बागुल )
 

sambhaji raje chatrapati warns state governments regarding MPSC exams


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji raje chatrapati warns state governments regarding MPSC exams