समीर वानखेडेंच्या हॉटेल-बारला दिलेला परवाना रद्द

NCB zonal director Sameer Wankhede
NCB zonal director Sameer Wankhedeesakal
Summary

जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडेंच्या सद्गुरु हॉटेल आणि बारला दिलेला परवाना रद्द केला आहे, कारण..

मुंबई : ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Collector Rajesh Narvekar) यांनी मंगळवारी एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मालकीच्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) सद्गुरु हॉटेल आणि बारला दिलेला परवाना रद्द केलाय. कारण, त्यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन आणि फसवणूक करून तो मिळवला होता, असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

NCB zonal director Sameer Wankhede
ढाब्यावर जेवण करून गावाकडं परताना 3 मित्रांचा जागीच अंत

ठाणे उत्पादन शुल्क अधीक्षक आणि वानखेडेंच्या वकिलांचं म्हणणं ऐकल्यानंतर नार्वेकर यांनी वाइन, स्पिरीट आणि मद्य विक्रीसाठी परवानगी दिलेल्या हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा 6 पानी आदेश दिलाय. वानखेडेंना 27 ऑक्टोबर 1997 रोजी परवाना मिळवल्याचं आढळून आलं. 21 वर्षांच्या पात्रतेच्या तुलनेत त्यांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी होतं, त्यामुळं त्यांचा परवाना रद्द करण्यात आलाय. बारचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदी कायद्याचे कलम 54 लागू केलंय.

NCB zonal director Sameer Wankhede
श्रीलंकेत 21 भारतीय मच्छिमारांना अटक; नौदलाकडून दोन नौका जप्त

NCP च्या नवाब मलिकांनी हे प्रकरण महासंचालक, NCB, CVC आणि राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडं नेलं होतं. मलिकांनी दोन मुद्दे उपस्थित केले होते. अखिल भारतीय सेवेचा सदस्य स्वत:चा व्यवसाय करू शकतो का आणि वानखेडेंना परवाना दिला, त्या दिवशी ते अल्पवयीन असतानाही त्यांनी परवाना कसा मिळवला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com