esakal | NCB च्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना समीर वानखेडेंचे सडेतोड उत्तर | sameer wankhede
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

NCB च्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह, समीर वानखेडेंचे सडेतोड उत्तर

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात कॉर्डेलिया क्रूझवर NCB ने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसने (Ncp) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. NCB च्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आता एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan khan) अटक करण्यात आली आहे.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने NCB ने दोन ऑक्टोबरला क्रूझवर केलेली कारवाई बनावटी असल्याचा आरोप केला आहे. तिथे कुठलेही ड्रग्ज सापडले नाही, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. या कारवाईच्यावेळी एनसीबीच्या टीम सोबत उपस्थित असलेल्या दोनजणांबद्दल राष्ट्रवादीने प्रश्न विचारले आहेत. यातला एक जण भाजपाचा सदस्य आहे.

हेही वाचा: लखीमपूर हिंसाचार प्रकरणी दोघांना अटक

या आरोपांवर आता समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. आम्ही आधीच यासंबंधी पत्रक प्रसिद्ध केलं आहे. "NCB एक सक्षम आणि प्रोफेशनल संस्था आहे. व्यक्तीपेक्षा NDPS कायदा आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे" असे समीर वानखेडे म्हणाले.

हेही वाचा: PM मोदींनी २० वर्षे एकही सुट्टी न घेता काम केलं - अनुराग ठाकूर

राष्ट्रवादी ज्या मनीष भानुशाली आणि किरण गोस्वामीवरुन एनसीबीवर आरोप करत आहे, ते पंचनाम्याच्यावेळच्या साक्षीदारांपैकी एक आहेत, असे एनसीबीने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. "ड्रग्ज संकटाच उच्चाटन करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुम्ही मागच्यावर्षीच्या आकड्यांबद्दल बोलत असाल, तर भारतात एनसीबीने खूप चांगली कामगिरी केलीय. आम्ही १०६ गुन्हे दाखल केलेत. ३०० पेक्षा जास्त आरोपींना अटक केलीय. डोंगरीसह दोन ठिकाणी ड्रग्ज निर्मितीचे कारखाने उद्धवस्त केलेत. ड्रग्ज तस्करांच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत" असे समीर वानखेडे म्हणाले.

loading image
go to top