
Samruddhi Expressway
ESakal
मुंबई : समृद्धी महामार्गावरून सुसाट आलेल्या वाहनधारकांची आमने-साकेत (ठाणे)दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. त्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्चून सुमारे २९ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. साकेत-आनंदनगरदरम्यान उन्नत मार्ग तर छेडानगर (घाटकोपर)-आनंदनगरदरम्यान पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार केला जात आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धीवरून विनाअडथळा मुंबईत जाता येईल.