Samruddhi Mahamarg Accident : समृध्दी महामार्गावर २३ दिवसात ६ जणांचा मृत्यू

१०० पेक्षा अधिक अपघातांची संख्या गावठी कुत्रे, नील गाय आणि जंगली डुकरांचा महामार्गावर हैदोस
Samruddhi Mahamarg accident 6 people died on Samrudhi highway in 23 days mumbai
Samruddhi Mahamarg accident 6 people died on Samrudhi highway in 23 days mumbaiesakal

मुंबई : हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गेल्या २३ दिवसांमध्ये १०० पेक्षा अधिक अपघात झाले आहे. ज्यामध्ये सर्वाधिक अपघात चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न केल्याने झाल्याचे पुढे आले आहे.

अतिवेगाने वाहन चालवणे, अनफिट वाहणांचा महामार्गावर वापर, वाहन चालवताना डुलकी येणे, रिमोट केलेल्या टायरचा वापर केल्याने टायर फुटून अपघात होणे अशा कारणांमुळे समृध्दी महामार्गावर गंभीर अपघातांच्या घटना घडल्या आहे.

ज्यामध्ये ११ ते ३१ डिसेंबर दरम्यान ४ मृत्यू तर १ ते ६ जानेवारी पर्यंत २ असे एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले त्यामुळे नागपूर ते शिर्डी या सुसाट समृध्दी महामार्गाचा वापर करून झपाट्याने मुंबई पोहचण्याची संख्या वाढली आहे. त्यातच शिर्डीत देवदर्शन घेऊन अनेकजण आता नागपूर ते मुंबई वाहनांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो आहे.

मात्र, सरळ असलेल्या समृध्दी महामार्गावर अनफिट अवजड वाहनांची वाहतूकदरम्यान त्यांच्या वाहनांचे टायर फुटून अपघात होत आहे. त्याशिवाय इंजिन क्षमता, रस्ता मोकळा असल्याने अनफिट वाहनाला बेदरकारपणे चालवून वेगाशी शर्यत लावण्याच्या प्रयत्नात अवजड वाहनाच्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

यामध्ये सर्वाधिक अपघात मलकापूर, जालना दरम्यान झाल्याचे पुढे आले असून, यामध्ये गावठी जनावर आणि वन्यप्राण्यांचाही मृत्यू मोठ्या प्रमाणात झाले आहे. नील गाय, जंगली डुक्कर आणि त्यांचे पिल्लांचे ही सर्वाधिक अपघात झाले आहे. परिणामी अशा अपघातांच्या ठिकाणी आता उपाय म्हणून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने जाळ्या लावायला सुरुवात केली असल्याचे सांगितले आहे.

हरभर्याच्या पिकांमुळे माकडांचा हैदोस

समृध्दी महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या हरभरा पिकांचे सर्वाधिक लागवड केली आहे. त्यामुळे डुक्कर आणि माकडांचे झुंड समृध्दी महामार्गावर मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या वाहन अपघातांमध्ये सर्वाधिक डुक्कर आणि माकडांच्या पिल्लांचा जीव घेल्याचेही एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वाहतूक नियम पाळण्याची गरज

समृध्दी महामार्गावर सध्या वाहतूक जास्त नसल्याने वाहन चालक आपल्या वाहनाला बेदरकारपणे चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याशिवाय नवीन असलेल्या आणि सरळ असलेल्या महामार्गावर जुन्या अनफिट वाहनाला सुद्धा वेगाने चालवण्याचा पराक्रम केला जात असल्याने सर्वाधिक अपघात चालकांच्या दुर्लक्षितपणामुळे होत असल्याचे एम एस आर डी सी च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com