Raj Thackeray Hanuman Chalisa Row | संदीप देशपांडेंची पोलिसांच्या हातावर तुरी, 'शिवतीर्थ' समोरच चकवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sandeep deshpande

संदीप देशपांडेंची पोलिसांच्या हातावर तुरी, 'शिवतीर्थ' समोरच चकवा

महाराष्ट्रात मशिदींच्या भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम काल संपला. यानंतर मनसेने आक्रमक होत राज्यात ठिकठिकाणी भोंग्याविरोधात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली.(Raj Thackeray)

पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. अनेक पदाधिकारी सध्या 'आऊट ऑफ रिच' आहेत. संदीप देशपांडेही पोलिसांना सापडत नव्हते. त्यांना याआधीच मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र शिवतीर्थवर येताच देशपांडेनी पोलिसांना चकवा दिला. (Sandeep Deshpande Meets Raj Thackeray over Hanuman Chalisa Row)

हेही वाचा: कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होताच राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट

अखेर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देशपांडे दाखल झाले. त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बाहेर येत देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर तत्काळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना चालत जाण्याचा बहाणा केला. याच क्षणी देशपांडे यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन पोहोचला. पोलीस पाठीमागे पळत असतानाचा देशपांडे यांनी गाडीत बसून थेट पळ काढला. शिवतीर्थ समोरच त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली.

मात्र या झटापटीत एका महिला अधिकाऱ्याला दुखापत झाली आहे. संबंधित महिला अधिकारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर बंदोबस्तासाठी तैनात होत्या. देशपांडे पळून जात असताना त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.

Web Title: Sandeep Deshpande Absconds From Raj Thackeray House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sandeep Deshpande
go to top