Raj Thackeray | लोकांचा राज ठाकरेंवरचा विश्वास वाढत चाललाय - संदीप देशपांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns chief raj thackeray
लोकांचा राज ठाकरेंवरचा विश्वास वाढत चाललाय - संदीप देशपांडे

लोकांचा राज ठाकरेंवरचा विश्वास वाढत चाललाय - संदीप देशपांडे

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये आलेली दिसत आहे. त्या संदर्भात आज शिवतीर्थावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आठवडाभर या बैठका सातत्याने सुरू राहणार आहेत, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. (MNS Sandeep Deshpande)

हेही वाचा: Video: फडणवीस राज ठाकरे भेट ; मनसे नेत्याचं सूचक ट्विट

या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशपांडे म्हणाले की, महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्यासोबत ईशान्य मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आठवडाभर या बैठका सुरू राहणार आहेत मुंबईतील सर्व विभागातील पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटणार आहेत. मनसे भाजप युतीची चर्चा या बैठकांमध्ये नाही, असंही देशपांडेंनी सांगितलं.

हेही वाचा: मनसे कोथरूड विभागाच्यावतीने प्रशासनाच्या विरोधात 'रस्त्यांवरचे खड्डे' आंदोलन

राज्यातल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गंमत सुरू आहे लोकांच मनोरंजन होतय. लोक हे सगळं पाहत आहेत याचा ते गांभीर्याने विचार ही करतील. ज्या पद्धतीने राजकारणी वागत आहेत त्यावरून लोकांचा राज ठाकरे यांच्यावर विश्वास वाढला आहे. या राजकीय खेळात महाराष्ट्रातील मराठी जनतेला,हिंदू बांधवांना राज ठाकरे यांचाच एक पर्याय आहे, असा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Sandeep Deshpande Mns Raj Thackeray Bmc Election Mns Bjp Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..