Wine in grocery shops | राज ठाकरेसाहेब यांनी कोरोना काळात मद्यशॉप सुरू करा सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

'सगळ्यात आधी राज ठाकरेंनी वाईन शॉप सुरू करायला सांगितलं'

राज्य सरकारने किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांनी यावर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र केल्याचंही म्हटलं. लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र त्याआधी सरकारवर निशाणा साधला जातोय. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता यामध्ये उडी घेतली आहे. (Wine in grocery shops)

राज ठाकरेसाहेब यांनी कोरोना काळात मद्यशॉप सुरू करा सूचना केली होती, असं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे. राज्याचा महसूल वाढवा यासाठी राज ठाकरेंनी ही सूचना केली होती, असं त्यांनी म्हटलंय. त्यावेळी संजय राऊत यांनी अग्रलेख लिहून राज साहेबांवर टीका केली, तो अग्रलेख ऑनलाईन का काढण्यात आला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सरकारला आता वाईन किराणा मालाच्या दुकानात देण्याची सुबुद्धी का सुचली? कंपन्यांचे शेयर घेतले म्हणून सुबुद्धी सुचली का? असा सवाल देशपांडेंनी उपस्थित केला आहे. भाजप के पाप गिनवानेसे शिवसेने के पाप कम नही होते, असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय.

वाईन मिळणार स्टोअर्समध्ये

महाविकास आघाडी सरकाच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर राज्यात किराणा शॉप, सुपर मार्केट, ग्रोसरी स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. लवकरच यावर अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, आणि द्राक्ष उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल असं सरकाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मविआ सरकारमधील नेते देखील त्याची पाठराखण करत महसूली उत्पन्नात भर पडत असल्याचं सांगत आहेत. मात्र विरोधकांनी या निर्णयावर टीका केली आहे.

Web Title: Sandeep Deshpande News Raj Thackeray On Wine In Grocery Shops

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Wine shop
go to top