

balasaheb thorat
esakal
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला. मतदार याद्यांमधील झालेला गोंधळ दुरुस्त केल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, अशी मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली. यावेळी वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक प्रक्रियेतील *मतदार याद्या बोगस असल्याचा गंभीर आरोप* करत ‘इनसाईड स्टोरी’ उघड केली.