
मुंबई : पालिकेतील घनकचरा विभागातील खासगीकरणाविरोधात पालिका कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर २३ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आला आहे; मात्र पालिका प्रशासनाने तोपर्यंत निविदा रद्द न केल्यास संप अटळ असल्याचा इशारा कामगारांच्या संघर्ष समितीने दिला आहे.