मुंबईच्या बेस्ट सेवेतील सांगली विभागाच्या कर्मचाऱ्यांची सेवा रद्द

प्रशांत कांबळे
Thursday, 29 October 2020

लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमात सेवा द्यायला सांगली विभागातून आलेल्या 400 एसटी कर्मचाऱ्यापैकी 100 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. 

मुंबई: लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमात सेवा द्यायला सांगली विभागातून आलेल्या 400 एसटी कर्मचाऱ्यापैकी 100 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. यामध्ये 91 असिमटोमॅटिक तर 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षण असल्याने त्यांच्यावर सांगली विभागातील विविध कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. त्यामुळे नव्याने दुसऱ्या टप्यात येणाऱ्या सांगली विभागातील कर्मचाऱ्यांची मुंबईतील नियुक्तीच रद्द केली आहे.

रस्त्यांवरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी बेस्ट उपक्रमात एसटीच्या एक हजार बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, बीड, कोल्हापूर या विभागांमधून प्रत्येकी 100 बसेस आणि त्यावर 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. महामंडळाने या कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा केली होती. मात्र, कोरोनाच्या काळात अपेक्षित असलेली सुविधा आणि सुरक्षा करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांचे मुंबईत हाल झाल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला.

अधिक वाचाः  यंदा STची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द,अनिल परब यांनी केली मोठी घोषणा

दरम्यान 15 दिवसांची मुंबईतील ड्युटी बजावल्यानंतर आपआपल्या विभागात जाऊन या कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर सांगली विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक 100 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले. त्यामुळे, एसटी महामंडळाने सांगली विभागातील गाड्या आणि कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचाः  पक्ष महत्वाचा की सरकार उद्धव ठाकरेंना पडलेला प्रश्न- भाजप

------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Sangli division best service Mumbai canceled 100 employees corona positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli division best service Mumbai canceled 100 employees corona positive