Milind Vasant Bhondve
Milind Vasant Bhondvesakal

Milind Vasant Bhondve : क्रिकेट खेळताना खेळाडूचा हृदयविकाराने सांगवीत मृत्यू

मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून लोकप्रिय असणाऱ्या मिलिंद वसंत भोंडवे यांचे सांगवी येथे शुक्रवारी (ता. २४) क्रिकेट खेळत असताना मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या आकस्मिक घटनेने भोंडवे कुटुंबावर आणि दारुंब्रे गावावर शोककळा पसरली आहे.
Published on

शिरगाव : मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून लोकप्रिय असणाऱ्या मिलिंद वसंत भोंडवे यांचे सांगवी येथे शुक्रवारी (ता. २४) क्रिकेट खेळत असताना मैदानावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या आकस्मिक घटनेने भोंडवे कुटुंबावर आणि दारुंब्रे गावावर शोककळा पसरली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. शुक्रवारी दुपारी मिलिंद भोंडवे यांच्या संघाचा सामना सुरू होता.

त्या सामन्यामध्ये मिलिंद गोलंदाजी करत होते. गोलंदाजी करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते मैदानावर कोसळले. सर्व सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनावर सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com