
मुंबई : पालिकेतील सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. वाटाघाटींनंतर पालिकेने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. येत्या सोमवारी, २८ जुलै रोजी मागण्यांबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि कामगार संघटनांमध्ये औपचारिक करार होणार असून त्यामुळे २३ जुलैपासूनचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आला आहे. येत्या सोमवारी कामगारांचा विजयी मेळावा होणार आहे.