विहीरीत पडलेल्या चिमुकलीला सातवीत शिकणाऱ्या संजनाने एकटीने वाचविले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

विहिरीत पडलेल्या चिमुकली जागृतीचा जीव वाचविण्यासाठी संजनाने दाखवलेल्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शासनाने तिच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करून सन्मानित करावे, अशी मागणी मंजुळा निचिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

विक्रमगडः विहिरीत पडलेल्या चिमुकली जागृतीचा जीव वाचविण्यासाठी संजनाने दाखवलेल्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शासनाने तिच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करून सन्मानित करावे, अशी मागणी मंजुळा निचिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तर पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश भगवान सांबरे यांनी विहिरीत पडलेल्या जागृतीचा जीव वाचवणाऱ्या संजना व तिच्या कुटुंबाची भेट घेऊन तिचा सत्कार केला. केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांनी तिचे कौतुक केले. 

मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर सायंकाळी विक्रमगड तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कऱ्हेतलावली शाळेत 8 वीमध्ये शिकणारी संजना जेठु राव पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. त्या वेळी तेथे तिसरीच्या वर्गात शिकणारी जागृती विष्णू राव कळशी घेऊन आली आणि पाणी भरू लागली.

ही बातमी वाचा ः  काॅलेजमधील निवडणूकीबाबत शरद पवार म्हणाले...

तेवढयात जागृतीचा पाय घसरला व ती विहिरीत पडली. या वेळी संजनाने प्रसंगावधान दाखवत तिला पाण्यातून बाहेर काढले आणि खांद्यावर घेऊन धावत जवळच असलेल्या सरकारी दवाखान्यात गेली. डॉक्‍टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ तिची तपासणी केली आणि बोटाला झालेल्या जखमेवर मलमपट्टी करून तिला घरी सोडण्यात आले. 

सर्व परिस्थिती एकटीने हाताळली 
जागृती विहिरीत पडल्यापासून दवाखान्यात आणेपर्यंत सर्व परिस्थिती संजनाने एकटीने हाताळली. संयमाने व तेवढ्याच धाडसाने संजनाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसऱ्या दिवशी दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी शाळेत येऊन तिला बक्षीस देऊन तिचे कौतुक केले. त्याप्रसंगी डॉ. चौधरी म्हणाल्या "एक जीव वाचवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, ते आम्हा आरोग्य विभागातील लोकांना माहीत आहे. त्यामुळे संजनाने दाखवलेले धाडस खूप मोठे आहे.' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjana rescues the girl who fell into the well