

Sanjay Gandhi National Park Residents Movement
ESakal
मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींना घरे रिकामी करण्यासाठी वन विभागाने नाेटिसा बजावल्या आहेत. याविराेधात बुधवारी (ता. २१) राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर धडक देऊन आदिवासींनी जाेरदार निदर्शने केली. या आंदाेलनात ५६ आदिवासी पाड्यांतील रहिवाशांनी सहभाग घेऊन अस्तित्वासाठी लढा देण्याचा निर्धार केला. दरम्यान, आंदोलनामुळे बोरिवली परिसरातील वाहतुकीवर काही वेळ परिणाम झाला होता; मात्र पोलिसांनी परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली.