esakal | संजय गांधी उद्यान उघडणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

संजय गांधी उद्यान उघडणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कांदिवली : बोरिवली (Borivali) पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग माहिती केंद्राच्या वतीने उद्यानात वन्य जीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येत आहे.

निसर्ग, प्राणी, पक्षी आणि पर्यावरणप्रेमींना वन्य जीव सप्ताहाच्या निमित्ताने उद्यानाची बंद असलेली प्रवेशद्वारे खुली होऊन बहरलेला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे; मात्र १ ते ७ ऑक्टोबर २०२१ या सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांना पैसे मोजावे लागणार असल्याने काहींना इच्छेला मुरड घालावी चर्चा आहे. लागणार असल्याची वन्यजीव सप्ताहात उद्यानातील शिलोंडा, नागला ब्लॉक पायवाटेसह ठाणे येवर सफरीत प्रत्यक्ष चालत निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. तसेच नागरिक विज्ञान कार्यशाळा, गटांसाठी ट्रेझर हंट, फोटोग्राफी, मुलांसाठी विशेष कार्यशाळा, वन्यजीवन फोटोग्राफी, खत प्रकल्प व कोकडमा कार्यशाळा, ऑकिंड उद्यानास भेट, हेरिटेज वॉक, तसेच निसर्ग वन्यजीवांवर आधारित माहितीपट दाखवण्यात येणार आहेत.

हेही वाचा: नवीन पूल झाला पण जुना पूल तसाच असल्याने पुराचा धोका कायम

वारली पेंटिंगची कार्यशाळा तसेच वन्य जीवांची सुटका आणि पुनर्वसन यावर ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. काही कार्यक्रम मोफत ७ ऑक्टोबर रोजीचे कलाप्रदर्शन, तसेच वन्यजीव सप्ताहामध्ये फिल्म स्क्रिनिंग व ऑनलाईन इव्हेंट्स मोफत असणार आहेत.

हेही वाचा: ब्रेकिंगः वाघूर धरणाचे प्रथम सर्व २० दरवाजे उघडले

याव्यतिरिक्त सर्व उपक्रम आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी निसर्गप्रेमींना दररोज सरासरी 300 ते ७०० रुपये मोजावे लागणार आहेत.

loading image
go to top