
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली जात आहे. मात्र डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची घनिष्ट मैत्री असून या प्रकरणी आदित्यची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.